बॉक्‍सर दुर्योधनचे आव्हान संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

संथ सुरुवात केल्याचा फटका दुर्योधन सिंग नेगीला बसला आणि त्याचे जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेच्या 69 किलो गटातील आव्हान आटोपले आहे. रशियात सुरू असलेल्या या स्पर्धेत तो दुसऱ्या फेरीत जॉर्डनच्या झेयाद एशाशविरुद्ध पराजित झाला.

मुंबई : संथ सुरुवात केल्याचा फटका दुर्योधन सिंग नेगीला बसला आणि त्याचे जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेच्या 69 किलो गटातील आव्हान आटोपले आहे. रशियात सुरू असलेल्या या स्पर्धेत तो दुसऱ्या फेरीत जॉर्डनच्या झेयाद एशाशविरुद्ध पराजित झाला.

माजी राष्ट्रीय विजेत्या दुर्योधनची सुरुवात संथ होती, तसेच त्याने सुरुवातीस बचावात्मक पवित्रा घेतला. त्याचा फायदा घेत झैयादने जोरदार ठोसे दिले. दुसऱ्या फेरीपासून दुर्योधनने चांगला प्रतिकार केला, पण त्याचा प्रतिस्पर्धी जास्त वेगवान होता, तसेच त्याचे ठोसे जास्त अचूक होते. तिसऱ्या तसेच अखेरच्या फेरीच्यावेळी झेयाद जास्त थकला होता, पण त्याने चांगला बचाव करीत दुर्योधनला वर्चस्वापासून रोखले.

दुर्योधनच्या पराभवामुळे भारताच्या आता पाचच बॉक्‍सरना पदकाची आशा आहे. त्यापैकी चौघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ते पदकापासून एक विजय दूर आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boxer duryodhan lost in world championship