Olympics: भारताचं दुसरं पदक निश्चित; बॉक्सर लवलिना उपांत्य फेरीत

Lovlina Borgohain
Lovlina Borgohain
Summary

बॉक्सर लवलिना बोर्गोहेन Lovlina Borgohain हीने चीनच्या नियन-चिन चेनवर Chinese Taipei's Nien-Chin Chen मात करत ऑलिम्पिकमधील आपलं पदक निश्चित केलं आहे.

टोकिओ- बॉक्सर लवलिना बोर्गोहेन Lovlina Borgohain हीने चीनच्या नियन-चिन चेनवर Chinese Taipei's Nien-Chin Chen मात करत ऑलिम्पिकमधील आपलं पदक निश्चित केलं आहे. लवलिनाने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून किमान ती कांस्य पदकाची मानकरी ठरणार आहे. त्यामुळे भारताचं ऑलिम्पिकमधील हे दुसरं पदक असणार आहे.(Boxing Women Welterweight Quarterfinal 2 Lovlina Borgohain beats Chinese Taipeis Chin Chen Nien assured of a medal)

आसामच्या 23 वर्षीय लवलिना बोर्गोहेन हिने उत्तम खेळीचे प्रदर्शन केले. अंतिम फेरीत लवलिनाने 4-1 अशा फरकाने प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. लवलिनाने याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक जिंकलं आहे. लवलिनाच्या कामगिरीमुळे भारताला दुसरं पदक मिळणं निश्चित झालं आहे. लवलिनाला अद्याप पदक मिळालं नसलं तरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. ऑलिम्पिकमध्ये कोणतंही पदक मिळालं तरी ते अभिमानाची गोष्ट असणार आहे. दुसरीकडे, बॉक्सर सिमरजीत कौर हिला उपांत्य फेरीत प्रवेश करता आले नाही. त्यामुळे पदकाचं तिचं स्वप्न भंगलं आहे.

दरम्यान, महिला तिरंदाज दीपिकाकुमारीने (deepika kumari) रशियाच्या क्सेनिया पेरोवाचे (ksenia perova) पराभव करुन उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दीपिकाकुमारी सध्या महिला तिरंदाजांमध्ये (archery) जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. दीपिकाकुमारीने शूट ऑफच्या फेरीत विजयाची नोंद केली. दीपिका कुमारीने पहिला सेट २८-२४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये क्सेनिया पेरोवाने पुनरागमन केले. २६-२७ अवघ्या एका गुणाच्या फरकाने दीपिकाने हा सेट गमावला. तिच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com