कोपा अमेरिका फुटबॉल : पेरू गोलरक्षकाची ब्राझीलवर कृपादृष्टी 

Brazil
Brazil

साओ पावलो : ब्राझील आक्रमकांनी पेरू गोलरक्षक पेद्रो गॅलीस याच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला. ही लढत 5-0 अशी सहज जिंकत ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत गटविजेतेपद पटकावले. आता यामुळे ब्राझील-अर्जेंटिना अशी उपांत्यपूर्व लढत होण्याची शक्‍यता आहे. 

"एकतर्फी विजय काही दूर नाही. हे जाणून होतो. आम्ही कसून सरावही करीत आहोत. सफाईदार कामगिरी केली की चाहते खूष होतात. ते आम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहित करतात. आम्हाला विजयासाठी प्रेरणा देतात,'' असे ब्राझील कर्णधार ऍल्वेसने सांगितले. त्याने पहिल्या दोन सामन्यांच्या वेळी चाहत्यांनी हुर्यो केली होती, त्यांना जणू उत्तर दिले. 

डार्विन मॅचिस याच्या दोन गोलमुळे व्हेनेझुएलाने बोलिव्हियाचा 3-1 असा पराभव केला. या विजयामुळे गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धेत व्हेनेझुएलाने पेरूस मागे टाकले. आता पेरूच्या आशा अन्य गटांतील निकालावर अवलंबून आहेत. आता प्रथमच चार गुण असूनही साखळीत बाद होणारा पेरू हा पहिला संघ ठरू शकेल. 

पेरूवर ही वेळ त्यांचा गोलरक्षक गॅलीस याने आणली. ब्राझीलच्या पहिल्या गोलच्या वेळी गॅलीस पहिल्या प्रयत्नात चेंडू गोलपोस्टला लागला आणि त्याची दिशा बदलली, असे सांगू शकेल; पण दुसऱ्या गोलच्या वेळी चेंडू पुढे सरसावलेल्या गोलरक्षकाच्या डोक्‍यावरून थेट फिर्मिनोकडे गेला. गोलरक्षक वेगाने मागे येऊ लागला; पण फिर्मिनोने त्यापेक्षा वेगाने चेंडू गोलजाळ्यात धाडला. ब्राझीलने 32 मिनिटांत चार गोल केल्यावर निकाल स्पष्ट झाला आणि पेरूने सामनाच जणू सोडून दिला. त्यांचा सपोर्ट स्टाफ व्हेनेझुएला-बोलिव्हिया निकालाकडे जास्त लक्ष देत होता. बोलिव्हियाने हार टाळली असती, तर पेरूने आगेकूच केली असती; पण व्हेनेझुएलाने हुकमत राखत पेरूचे स्वप्न उद्‌ध्वस्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com