रोनाल्डो अविश्‍वसनीय; पण मेस्सी जादुगार!

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

मॉस्को : 'पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो अविश्‍वसनीय खेळाडू आहे.. पण अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी अतुलनीयच आहे..' असे मत ब्राझीलचे महान फुटबॉलपटू रोनाल्डो यांनी व्यक्त केले. 'रोनाल्डो की मेस्सी' या वादामध्ये बहुतांश फुटबॉलप्रेमी विभागले गेले असताना ब्राझीलच्या रोनाल्डो यांनी त्यांचे मत मेस्सीला दिले आहे. 

'ख्रिस्तियानो रोनाल्डोचा 'ऍटिट्युड' जबरदस्त आहे.. तो सतत विजयाच्याच ध्येयाने प्रेरित झालेला असतो.. तो दर्जेदार खेळाडू आहे.. पण माझ्या मते लिओनेल मेस्सीचा खेळ जादुई आहे.. त्याच्यामुळे फुटबॉल पाहण्यास मजा येते..' असे मत रोनाल्डो यांनी जर्मनीतील एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 'मेस्सीचं ड्रिबलिंग, त्याची फुटबॉल खेळण्याची पद्धत आणि प्रतिस्पर्ध्याला धक्का देत अचानक आक्रमण करण्याची त्याची हातोटी यामुळे त्याचा खेळ जादुई वाटतो', असे रोनाल्डो त्या मुलाखतीत म्हणाले. 

ब्राझीलकडून खेळताना रोनाल्डो यांनी 1994 आणि 2002 मध्ये विश्‍वकरंडक जिंकला. विश्‍वकरंडक स्पर्धेत रोनाल्डो यांनी 15 गोल केले आहेत. विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत रोनाल्डो दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अव्वल स्थानी मिरोस्लाव क्‍लोज (16 गोल) आहेत.

Web Title: Brazil Great Ronaldo praises Lionel Messi