पिस्तूलमध्ये बिघाड, राहीचे सुवर्ण हुकले

२५ मीटर प्रकारात रौप्यवर मोहोर; मनूला सहावे स्थान
पिस्तूलमध्ये बिघाड, राहीचे सुवर्ण हुकले

रोक्लॉ (पोलंड) : महाराष्ट्राचीच नव्हे भारतातील दिग्गज नेमबाज राही सरनोबत हिचे प्रेसिडेंट कपमधील सुवर्णपदक थोडक्यासाठी हुकले. अखेरच्या दोन मालिका सुरू असताना पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे राहीला महिलांच्या वैयक्तिक २५ मीटर पिस्तोल या प्रकारात ३१ गुणांसह रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.

पिस्तूलमध्ये बिघाड होण्याआधी राही सरनोबतने सलग तीन वेळा लक्ष्याचा अचूक वेध घेतला होता, पण अखेरच्या टप्प्यात पिस्तूलमध्ये बिघाड झाला आणि राही सरनोबतला सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले. जर्मनीच्या वेन्नेकॅम्पने ३३ गुणांसह सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली. मथील्ड लामोले हिने २७ गुणांसह ब्राँझपदक पटकावले. महिलांच्या या प्रकारात भारताच्या मनू भाकर हिची सहाव्या स्थानावर घसरण झाली. दरम्यान, राही सरनोबत व मनू भाकर या दोन्ही भारतीय नेमबाजांनी पात्रता फेरीत ५८३ अशा समान गुणांची कमाई केली होती.

पिस्तूलमध्ये बिघाड, राहीचे सुवर्ण हुकले
राज्य सरकारचे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अस्त्र

मनूला दुसरे सुवर्ण, भारताला पाच पदके

भारतीय संघाने प्रेसिडेंट कप या नेमबाजी स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदकांसह एकूण पाच पदकांची कमाई केली. मनू भाकर हिने मिश्र प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. मनू भाकरचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. मनू भाकरने इराणच्या जावेद फोरॉगी याच्यासोबत १० मीटर एअर पिस्तोल मिश्र टीम प्रकारात सुवर्णपदक जिंकले. यानंतर तिने तुर्कीच्या ओझगुर वर्लीक याच्या साथीने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तोल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तसेच याआधी पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तोल या प्रकारात सौरभ चौधरी याने रौप्य व अभिषेक वर्मा याने ब्राँझपदक पटकावले होते. या स्पर्धेत भारताचा सात सदस्यीय चमू सहभागी झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com