आशियाई नेमबाजी स्पर्धेत शाहू माने यास कास्य

Bronze To Shahu Mane In Asian Shooting Tournament
Bronze To Shahu Mane In Asian Shooting Tournament

कोल्हापूर - दोहा (कतार) येथे झालेल्या १४ व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरचा युवा ॲालिंपिकपटू शाहू तुषार माने याने ज्युनियर गटामध्ये भारतीय ज्युनियर संघाचे प्रतिनिधीत्व करताना वैयक्तिक कांस्य व सांघिक सुवर्ण पदक पटकाविले.

तो पात्रता फेरीत ६२९:३ गुणांसह प्रथम स्थानावर होता. अंतिम फेरीत खराब सुरवात होऊनही त्याने आपली कामगिरी उंचावत सहाव्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तृतीय स्थानी असणाऱ्या झांग जुनाले या चायनीज नेमबाजासोबत शाहूचे समान गुण झाले. त्यामुळे रौप्य पदकासाठी एका शाॅटचा शुटआउट घेण्यात आला. त्यात शाहूने १०:४ गुणांचा वेध घेतला, तर झांगने १०:५ गुण घेत रौप्य पदक घेतले. शाहूला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताचा धनुष श्रीकांत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शाहूने सर्वाधिक ६२९:३ तर त्याचे सहकारी धनुष ( तामिळनाडू ) याने ६२५:३ज्ञतसेच ह्दय (आसाम) याने ६२२:५ गुणांची कमाई करीत सांघिक सुवर्ण पदक जिंकले. 

शाहू सध्या १२ वी विज्ञान शाखेमध्ये  छत्रपती शाहू विद्यालयात शिक्षण घेत असून, तो दुधाळी येथील छत्रपती संभाजीराजे शुटींग रेंजवर सराव करीत आहे. त्याला आंतरराष्ट्रीय नेमबाज अर्जुन पुरस्कार विजेत्या सुमा शिरुर यांचे मार्गदर्शन लाभले आहे, तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कोल्हापूर जिल्हा मेन ॲनड वुमेन रायफल असोसिएशनचे प्रोत्साहन मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com