esakal | विश्वकरंडकाबाबत अस्वलाने वर्तविले होते 'हे' भविष्य
sakal

बोलून बातमी शोधा

bear

एका कलिंगडाचे दोन भाग करून एका-एका भागामध्ये फ्रान्स आणि क्रोएशियाचे झेंडे त्यामध्ये रोवण्यात आले होते. बुयानसमोर हे दोन्ही कलिंगडाचे भाग ठेवण्यात आले. थोडावेळ थांबल्यानंतर त्याने क्रोएशियाचा झेंडा रोवलेला कलिंगडाचा भाग निवडला आणि तो खाण्यास सुरवात केली.

विश्वकरंडकाबाबत अस्वलाने वर्तविले होते 'हे' भविष्य

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मॉस्को : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद फ्रान्सने मिळविल्याने एका अस्वलाने क्रोएशियाच्या विजयाबाबत केलेली भविष्यवाणी खोटी ठरली आहे. 

रविवारी मॉस्कोत झालेल्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले होते. या विजयापूर्वी पॉल ऑक्टोपसप्रमाणे एका अस्वलाकडून अंतिम सामन्याबाबत भविष्यवाणी करण्यात आली. या अस्वलाने क्रोएशिया विजयी होईल, अशी भविष्यवाणी केली होती. सर्बियातील रोयेव रुचे प्राणी संग्रहालयातील हे अस्वल आहे. या अस्वलाचे नाव बुयान आहे. एका कलिंगडाचे दोन भाग करून एका-एका भागामध्ये फ्रान्स आणि क्रोएशियाचे झेंडे त्यामध्ये रोवण्यात आले होते. बुयानसमोर हे दोन्ही कलिंगडाचे भाग ठेवण्यात आले. थोडावेळ थांबल्यानंतर त्याने क्रोएशियाचा झेंडा रोवलेला कलिंगडाचा भाग निवडला आणि तो खाण्यास सुरवात केली. त्यानंतर क्रोएशिया विश्वकरंडक जिंकणार हे व्हायरल झाले. पण, नेमके सत्य उलटे निघाले. फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव केला आणि भविष्यवाणी चुकीची ठरली. यापूर्वीही मांजर, बकरी आणि घोड्याकडून अशी भविष्यवाणी वर्तविण्यात आली होती.

क्रीडाविषयक आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक कराwww.sakalsports.com

ले शॉंपियॉं - ला फ्रान्स ■
आपण 'हिंदू-मुस्लिम' खेळत बसू: हरभजनसिंग ■ 
मॉड्रिचला गोल्डन बॉल, हॅरी केनला गोल्डन बूट ■ 
देशचॅम्प्स यांचा अनोखा विक्रम ■
फुटबॉलची अंतिम लढत दृष्टिक्षेपात ■
विंबल्डनमध्ये जोकोविचचे यशस्वी पुनरागमन; पटकाविले विजेतेपद ■
ओकुहारासमोर सिंधू पुन्हा निष्प्रभ ■

loading image
go to top