सामनाधिकारी लढत रद्द करणार असल्याची चर्चाच

वृत्तसंस्था
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली ट्‌वेंटी 20 राजधानीतील वाढत्या प्रदूषणामुळे रद्द करण्यात येईल किंवा थांबवण्यात येईल, अशी सातत्याने चर्चा फिरोजशाह कोटला स्टेडियमवर रंगली होती. रविवारी दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता दुपारनंतरही कायम असल्यामुळे या चर्चेला जास्तच उधाण आले होते.

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली ट्‌वेंटी 20 राजधानीतील वाढत्या प्रदूषणामुळे रद्द करण्यात येईल किंवा थांबवण्यात येईल, अशी सातत्याने चर्चा फिरोजशाह कोटला स्टेडियमवर रंगली होती. रविवारी दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता दुपारनंतरही कायम असल्यामुळे या चर्चेला जास्तच उधाण आले होते.

धुरके वाढल्यास चेंडू नीट दिसणार नाही, त्या वेळी सामनाधिकारी पंचांबरोबर चर्चा करून लढत थांबवतील असे सांगितले जात होते. वाढत्या प्रदूषणाचा चाहत्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होईल, असे अनेक तज्ज्ञांचे मत होते. त्यामुळे चाहते कमी येतील असाही अंदाज वर्तवला जात होता. प्रत्यक्षात स्टेडियम हाऊसफुल होते. एवढेच नव्हे, तर या सामन्यासाठी आलेले अनेक चाहते मास्कविनाच आले होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी ही लढत पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच घेण्याची सूचना केली.

नवी दिल्लीतील काही खासगी वृत्तवाहिन्या सामनाधिकारी नाणेफेकीच्या वेळी वातावरणाचा आढावा घेणार असल्याचे सांगत होत्या. एवढेच नव्हे, तर एका खासगी वृत्तसंस्थेने दुपारी 2 च्या सुमारास फिरोजशाह कोटला परिसरात धुरक्‍याचे साम्राज्य असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे, तर शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी पाऊस झाल्यानंतरही प्रदूषणाचे प्रमाण कमी न झाल्याबद्दल दिल्ली क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी चिंतेत असल्याचेही वृत्त होते. त्यातच या सामन्यासाठी असलेले सामनाधिकारी रंजन मदुगले यांनीच 2010 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर एक वर्ष बंदी घालण्याची शिफारस केली होती, याची आठवण करून दिली जात होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cancellation of delhi match discussed throughout the day