FIFA World Cup : मेस्सीचा 1000 वा सामना विजयाने साजरा; फर्नांडेझच्या स्वमय गोलने वाढवले होते अर्जेंटिनाचे टेन्शन

Argentina Defeat Australia Reached In Quarter Final
Argentina Defeat Australia Reached In Quarter Final esakal

Argentina Defeat Australia Reached In Quarter Final : अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने आपला 1000 वा सामना सार्थकी लावला. अर्जेंटिनाने राऊंड ऑफ 16 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 2 - 1 असा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाकडून कर्णधार लिओनेल मेस्सी, जुलिआन अल्वारेझ यांनी गोलं केला. तर ऑस्ट्रेलियाला खाते देखील अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडेसनेच उघडून दिले. त्याने 77 व्या मिनिटाला स्वयम गोल केला. आता अर्जेंटिनाचा क्वार्टर फायनलमध्ये नेदरलँडशी मुकाबला होणार आहे. नेदरलँडने युएसएचा 3 - 1 असा पराभव करत क्वार्टर फायनल गाठली आहे.

Argentina Defeat Australia Reached In Quarter Final
Brazil FIFA World Cup : ब्राझीलला धक्का! नेमारनंतर आता अजून दोन खेळाडूंना दुखापत, वर्ल्डकपमधून पडले बाहेर

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिनाने राऊंड ऑफ 16 मधील ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात पहिल्यापासूनच बॉल आपल्या ताब्यात ठेवण्यावर भर दिला. 4-3-3 अशी आक्रमक रणनितीने मैदानात उतरलेल्या अर्जेंटिनाने बचावात्मक पवित्र्यात असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर सातत्याने दबाव निर्माण केला. दरम्यान, अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीला सामन्याच्या 35 व्या मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्याने अर्जेंटिनाचे पिहिल्या हाफमध्येच खाते उघडले.

Argentina Defeat Australia Reached In Quarter Final
Pele Health Update : द ग्रेट पेले यांची प्रकृती खालावली; उपचारांना देत आहेत कमी प्रतिसाद

पहिल्या हाफमध्ये गोल केलेली अर्जेंटिना दुसऱ्या हाफमध्ये देखील आक्रमक खेळ करत होती. त्यांना सामन्याच्या 57 व्या मिनिटालाच दुसरा गोल डागण्याची सुवर्ण संधी ऑस्ट्रेलियाच्या बचाव फळीने दिली. याचा फायदा उचलत ज्युलिआन अल्वारेझने ऑस्ट्रेलियाचा गोलकिपर रेयानला चकवा देत 57 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने गोल फेडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याच प्रयत्नांना यश मिळाले ते 77 व्या मिनिटाला. मात्र ऑस्ट्रेलियाला सामन्यात पहिला गोल करण्यासाठी अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडेसने मदत केली. गुडविनने 25 यार्डवरून एक जोरदार फटका अर्जेंटिनाच्या गोलपोस्टच्या दिशेने मारला. हा फटका अडवण्याच्या नादात चेंडू फर्नांडेसच्या पायाला लागून गोलपोस्टमध्ये विसावला.

Argentina Defeat Australia Reached In Quarter Final
FIFA World Cup 2022 : इंग्लंडला बरोबरीत रोखणाऱ्या अमेरिकेचे पॅकअप; नेदरलँडने गाठली क्वार्टर फायनल

ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या 77 व्या मिनिटाला गोल केल्याने सामन्यात अखेरच्या क्षणी चुसर निर्माण झाली. मात्र ऑस्ट्रेलियाला पुन्हा काही अर्जेंटिनाचा गोलपोस्ट भेदता आला नाही. ऑस्ट्रेलियाने सामन्यात 5 वेळाच अर्जेंटिनाच्या गोलपोस्टवर आक्रमण चढवले. त्यातील एकच शॉट ऑन टार्गेट होता. दुसरीकडे अर्जेंटिनाने सामन्यात 693 पासेसच्या आधारे 69 टक्के बॉल पजेशन आपल्याकडे ठेवले. ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर 14 वेळा चढाई केली. त्यातील 5 शॉट्स हे अचूक राहिले.

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com