रिया अरोलकरने साकारले सीसीआयचे बॅडमिंटन विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

रिया अरोलकरने दोन लढती जिंकल्यामुळे सीसीआयने आंतर क्‍लब बॅडमिंटन स्पर्धेत महिला विभागात विजेतेपद जिंकले. त्यांनी निर्णायक लढतीत गोरेगाव स्पोर्टस्‌ क्‍लबला 2-1 असे पराजित केले.

मुंबई : रिया अरोलकरने दोन लढती जिंकल्यामुळे सीसीआयने आंतर क्‍लब बॅडमिंटन स्पर्धेत महिला विभागात विजेतेपद जिंकले. त्यांनी निर्णायक लढतीत गोरेगाव स्पोर्टस्‌ क्‍लबला 2-1 असे पराजित केले.

आंचल वासवानी आणि रिमा जैनने सलामीची दुहेरीची लढत गमावली, पण रिया अरोलकरने अलिशा नाईकला हरवून सीसीआयला बरोबरी साधून दिली आणि त्यानंतर वैष्णवी अय्यरच्या साथीत अलिशा- कनिष्का महाजनचा पाडाव केला.

दरम्यान, गोरेगाव स्पोर्टस्‌ने पुरुषांच्या अंतिम लढतीत सीसीआय ब संघाचा 2-0 असा पराभव केला. सुश्रुत कर्माकरने एकेरीची; तर प्रसाद-अक्षत या शेट्टीद्वयीने दुहेरीची लढत जिंकली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cci win inter club badminton