केंद्रीय विद्यालयाचा एकतर्फी विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

पुणे - हॉकी सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस, केंद्रीय विद्यालय बीईजी आणि सेंट पेट्रिक्‍स प्रशाला संघांनी मुलांच्या गटात एकतर्फी विजय मिळविले.

नेहरुनगर येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत केंद्रीय विद्यालयाने प्राईड इंग्रजी माध्यम प्रशालेचा ६-० असा धुव्वा उडवला. स्टिफन स्वामीची हॅटट्रिक आणि आदर्श सिंगचे दोन गोल उल्लेखनीय ठरले. एन्य एक गोल साहिल साळुंकेने केला. 

याच गटातील अखेरच्या सामन्यात ज्योती इंग्लिश स्कूलने ०-२च्या पिछाडीवरून सेंट उर्सुलाचा ३-२ असा पराभव केला. केशव बीटादूर आणि आरिन जैन यांनी सेंट उर्सुलाला आघाडीवर नेले होते. मात्र, ललित सिंगच्या गोलने ज्योती प्रशालेची पिछाडी कमी केली. उत्तरार्धात दोन मिनिटांत दोन गोल नोंदवून त्यांनी आपला विजय निश्‍चित केला. प्रथम ३८व्या मिनिटाला तेजस सिन्नुरकर आणि ३९व्या मिनिटाला रजनीश चौहान यांनी गोल केला. 

निकाल ः मुले ः नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल ४ (तेजस घुगे (३), ओंकार हांडे) वि.वि. एंजल प्रशाला, उरळी कांचन ०, केंद्रीय विद्यालय बीईजी, येरवडा ६ (स्टिफन स्वामी (३), आदर्श सिंग (२), साहिल साळुंके) वि.वि. प्राइड इंग्रजी माध्यम, आंबेगाव ०, सेंट पेट्रिक्‍स स्कूल, पिंपरी ३ (कायस्थ कृष्णा, प्रज्वल मोरे, अनुज जाधव) वि.वि. आर. पी. सबनीस विद्यामंदिर, नारायणगाव ०, ज्योती इंग्लिश माध्यम स्कूल, पिंपरी ३ (ललित सिंग, तेजस सिन्नुरकर, रजनीश चौहान वि.वि. सेंट उर्सुला स्कूल, आकुर्डी २ (केशव बीटादूर, आरिन जैन)

मुली ः एंजल प्रशाला, उरळी कांचन ० बरोबरी वि. न्यू मिलेनियम इंग्रजी माध्यम, नवी सांगवी ०, प्राईड इंग्लिश स्कूल, आंबेगाव १ (रेमसे भूमिका) वि.वि. सेंट पेट्रिक्‍स, हडपसर ०

Web Title: Central School of victory

टॅग्स