भारतीय बॅडमिंटन संघांसमोर आज कडवे आव्हान

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

बॅंकॉक - थॉमस आणि उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेस रविवारपासून प्रारंभ होत आहे. दोन्ही गटांत भारतासमोर कडवे आव्हान आहे. पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्यावर मदार आहे.

मागील दोन स्पर्धांत महिला संघाने दोन ब्राँझ जिंकली, तर पुरुषांना गेल्या आठ वर्षांत बाद फेरी गाठता आलेली नाही. पुरुषांच्या थॉमस स्पर्धेत भारतासमोर फ्रान्सचे आव्हान असेल. ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया आणि मातब्बर चीन इतर प्रतिस्पर्धी आहेत. बी. साईप्रणितने सांगितले, की स्पर्धा खडतर आहे. आमचा संघ तरुण आहे. आम्ही पदक जिंकू शकतो, पण आधी फ्रान्सविरुद्धच्या लढतीवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

महिलांच्या उबेर स्पर्धेत ‘अ’ गटात कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि मातब्बर जपान यांचे आव्हान असेल. रविवारी सलामीलाच कॅनडाशी गाठ पडली आहे. सिंधूशिवाय अश्‍विनी पोनाप्पा-एन. सिक्की रेड्डी ही जोडीसुद्धा नसेल. सिक्कीला ताप आला आहे. एकेरीत वैष्णवी भाले, अनुरा प्रभुदेसाई यांना संधीचे सोने करावे लागेल.

दुहेरीत मुंबईकर प्रजक्ता सावंत व पुण्याची संयोगिता घोरपडे, तसेच पूर्वीशा एस. राम-जे. मेघना अशा जोड्या आहेत.

Web Title: The challenge for the Indian badminton team will be tough today