"फिफा'समोर आव्हानांचा डोंगर 

अमोल गोखले
मंगळवार, 12 जून 2018

"फिफा'समोरील आव्हाने 
-पुढील स्पर्धेपासून संघांची संख्या 48 करणे 
-दक्षिण अमेरिकन संघटनांकडून पुढील वर्षापासून खरंच हे शक्‍य आहे का याची पडताळणी करण्याची सूचना 
-2026च्या यजमानपदाचा निर्णय. मोरोक्कोखेरीज अमेरिका, कॅनडा आणि मेक्‍सिको यांची एकत्रित निविदा 
-प्रशासक समितीने पाठविलेल्या नव्या मानांकन पद्धतीच्या प्रस्तावर चर्चा करून मान्यता देणे 

मॉस्को -"फिफा' विश्‍वकरंडक आता दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना होणाऱ्या दोन दिवसांच्या "फिफा'च्या बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि निर्णय अपेक्षित आहेत. 

फुटबॉल स्पर्धेचा आवाका आणि लोकप्रियता लक्षात घेता "फिफा' आणि अध्यक्ष इन्फॅनटिनो यांच्यासमोर आव्हानांचा डोंगरच उभा राहणार आहे. यापुढील विश्‍वकरंडक स्पर्धा 48 संघांत घेण्याचा मुख्य मुद्दा या बैठकीत ऐरणीवर राहणार आहे. यापुढील म्हणजेच 2022च्या स्पर्धेपासूनच हा निर्णय अमलात यावा, यासाठी बैठकीत आग्रह होण्याची शक्‍यता आहे. 

या संदर्भात रविवारी झालेल्या पहिल्या बैठकीत "फिफा'ने या संदर्भात पुढील स्पर्धा संयोजक कतारशी चर्चा करण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे बैठकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल असे मानले जात आहे. 

याच बैठकीत 2026 मधील स्पर्धेच्या यजमानपदाचा देखील निर्णय होईल. त्यासाठी मतदान होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर "फिफा'च्या जागतिक क्रमवारीसाठी नवी कल्पना राबविण्याचा विचार केला जात आहे. 

"फिफा'समोरील आव्हाने 
-पुढील स्पर्धेपासून संघांची संख्या 48 करणे 
-दक्षिण अमेरिकन संघटनांकडून पुढील वर्षापासून खरंच हे शक्‍य आहे का याची पडताळणी करण्याची सूचना 
-2026च्या यजमानपदाचा निर्णय. मोरोक्कोखेरीज अमेरिका, कॅनडा आणि मेक्‍सिको यांची एकत्रित निविदा 
-प्रशासक समितीने पाठविलेल्या नव्या मानांकन पद्धतीच्या प्रस्तावर चर्चा करून मान्यता देणे 

Web Title: CHALLENGES TO COMPLETE THE FIFA