सालाह-रामोसमधील शाब्दिक चकमक कायम

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

लंडन - चॅंपियन्स लीग अंतिम लढतीस जवळपास दोन आठवडे झाल्यानंतरही मोहंमद सालाह आणि सर्जिओ रामोस यांच्यातील शाब्दिक लढाई थांबण्यास तयार नाही. चेंडूवर ताबा घेण्यावरून रामोस आणि सालाह यांच्यात संघर्ष झाला आणि त्यात सालाह जखमी झाला. आता त्याचा विश्‍वकरंडक सहभागही अद्याप निश्‍चित नाही.

सालाहने दुखावलेल्या खांद्यासह चॅंपियन्स लीगची अंतिम लढत खेळायला हवी होती. अगदीच त्रास होत असेल तर वेदनाशमक इंजेक्‍शनही घेऊन खेळता आले असते, असे रामोसने सांगितले. सालाहच्या दुखापतीकरिता रामोसला जबाबदार धरले जात आहे. त्याची खिल्ली रामोसने उडवली. दुखापतीमुळे मी मैदानावर पडलो, त्या वेळी वेदना असह्य होत होत्या. विश्‍वकरंडकही धोक्‍यात येऊ शकतो, याची जाणीव झाल्याने त्रास जास्त वाढला, असे सालाहने सांगितले. रामोसच्या टिप्पणीचा त्याने समाचार घेतला. एखादा तुम्हाला रडवतो, त्यानंतर हसवण्याचा प्रयत्न करतो. आता त्यानेच सांगावे मी वर्ल्डकप खेळणार का. त्याने मला मेसेज पाठवला, पण मी त्याला उत्तर दिले नाही, असे सालाहने सांगितले.

Web Title: Champions League London