वर्ल्डकपला चॅंपियन्सच्या लोकप्रियतेचे आव्हान

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

या स्पर्धेत काय 
- खेळाच्या नव्या शैलीचा प्रयोग अपेक्षित नाही 
- बहुतेक संघ एकाच आक्रमकासह खेळण्याची शक्‍यता 
- चॅंपियन्स लीगची अंतिम लढत खेळलेल्या लिव्हरपूल, रेयाल माद्रिदप्रमाणे कोणताही संघ 4-3-3 खेळण्याची शक्‍यता कमी, त्या वेळी 4-2-3-1 यास पसंती 
- चॅंपियन्स लीगमध्ये नावाजलेल्या संघाच्या पराभवाने रंगत वाढली 
- वर्ल्डकपमध्ये ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन लवकर बाद झाल्यास त्यातील रंगतच कमी होईल 

मॉस्को - कमालीच्या नाट्यमय चॅंपियन्स लीग फुटबॉलमुळे विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसमोर लोकप्रियतेची नवी उंची गाठण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अव्वल संघांचा पराभव आणि गोलचा वर्षाव यामुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली होती. 

विश्वकरंडक स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू असतील; पण तरीही ही स्पर्धा कितपत उंची गाठेल याबाबत अनेक जण साशंक आहेत. केवळ युरोपातच नव्हे, तर अन्य देशांतही राष्ट्रीय संघापेक्षा क्‍लब महत्त्वाचा होत आहे. खेळाडू जास्त वेळ क्‍लबकडे आणि खूपच कमी कालावधीसाठी राष्ट्रीय मार्गदर्शकांकडे असतात, याकडे लक्ष वेधले जात आहे. 

क्‍लब मार्गदर्शकांचे मूल्यमापन करताना सर्वंकष विचार केला जातो. तर काही दिवसांत फार तर आठवडे खेळाडूंना मार्गदर्शन केल्यावर राष्ट्रीय मार्गदर्शकांचे भवितव्य ठरते. अर्थातच, ते प्रामुख्याने बचावास महत्त्व देतात. हेच 2002, 2006, 2010 च्या स्पर्धेतून दिसले. चार वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत गोल वाढले असले, तरी ते एकतर्फी लढतींनी वाढले होते. 

राष्ट्रीय मार्गदर्शकांच्या मर्यादा 
- खेळाडूंना मार्गदर्शन करण्यास कमी वेळ 
- क्‍लब मार्गदर्शकांच्या तुलनेत खूपच कमी अधिकार 
- संघनिवडीस फारसा वाव नाही 
- क्‍लबप्रमाणे जगभरातून कुठूनही खेळाडू आणण्याची मुभा नाही 
- राष्ट्रीय संघापेक्षा क्‍लबच्या स्पर्धा जास्त उत्पन्न देत असल्यामुळे राष्ट्रीय संघटकांचा ओढाही क्‍लबकडे 

वर्ल्डकपमधील गोल 
1998 स्पर्धा 171 गोल 
2002 स्पर्धा 161 गोल 
2006 स्पर्धा 147 गोल 
2010 स्पर्धा 145 गोल 
2014 स्पर्धा 171 गोल 

चॅंपियन्स लीगमधील 
एकंदर 401 गोल 
सरासरी गोल 3.2 
बाद फेरीत 3.6 

तज्ज्ञांचे बोल 
विश्‍वकरंडक स्पर्धेत बचावासच जास्त पसंती असेल. गोल करण्यापेक्षा गोलच्या बचावाकडे जास्त कल असतो. बचावाकडे लक्ष करीतच आक्रमण होते. प्रामुख्याने भर वेगवान प्रतिआक्रमणाकडे असतो. 
- कार्लोस अल्बर्टो परेरा, फिफाच्या स्पर्धा अभ्यासक समितीचे सदस्य 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल पूर्वी खूपच बचावात्मक असे; पण आता बार्सिलोनाच्या यशामुळे आक्रमकतेसही पसंती मिळत आहे. प्रत्येक मार्गदर्शकास आक्रमणास पसंती असते; पण त्याच वेळी खेळापेक्षा निकाल महत्त्वाचा ठरतो आणि त्याचा खेळाच्या व्यूहरचनेवरही परिणाम होतो. 
- मार्को व्हॅन बॅस्टन, फिफाचे मुख्य तांत्रिक विकास अधिकारी 

या स्पर्धेत काय 
- खेळाच्या नव्या शैलीचा प्रयोग अपेक्षित नाही 
- बहुतेक संघ एकाच आक्रमकासह खेळण्याची शक्‍यता 
- चॅंपियन्स लीगची अंतिम लढत खेळलेल्या लिव्हरपूल, रेयाल माद्रिदप्रमाणे कोणताही संघ 4-3-3 खेळण्याची शक्‍यता कमी, त्या वेळी 4-2-3-1 यास पसंती 
- चॅंपियन्स लीगमध्ये नावाजलेल्या संघाच्या पराभवाने रंगत वाढली 
- वर्ल्डकपमध्ये ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन लवकर बाद झाल्यास त्यातील रंगतच कमी होईल 

Web Title: champions league a threat to a football world cup popularity