INDvsSA : 9 कोटींसाठी BCCIने सोडली टीम इंडियाची सुरक्षा वाऱ्यावर

वृत्तसंस्था
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील दुसरा सामना आज चंदीगडमधील मोहालीतील स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय संघ एक दिवस आधीच मोहालीमध्ये पोहोचला आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला चंदीगड पोलिसांकडून कोणतीही सुरक्षा मिळणार नाही आहे आणि जबाबदार बीसीसीआय आहे. 

मोहाली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील दुसरा सामना आज चंदीगडमधील मोहालीतील स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय संघ एक दिवस आधीच मोहालीमध्ये पोहोचला आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला चंदीगड पोलिसांकडून कोणतीही सुरक्षा मिळणार नाही आहे आणि जबाबदार बीसीसीआय आहे. 

U19 Asia Cup गाजविणाऱ्या अर्थवची मुंबईच्या संघात एण्ट्री

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबर रोजी धर्मशाला येथे आयोजित करण्यात आलेला सामना पावसामुळं रद्द झाला. दरम्यान सोमवारी 16 सप्टेंबरला चंदीगड विमानतळावर भारतीय संघ पोहचला, मात्र त्यावेळी भारतीय संघाला कोणतीही सुरक्षा देण्यात आली नव्हती.

बीसीसीआयच्या एका चुकीमुळे भारतीय संघाच्या सुरक्षा धोक्यात आली आहे. चंदीगड पोलिसांनी टीम इंडियाला सुरक्षा देण्यास नकार दिल्यावर मोहाली पोलिसांना विमानातळावर जाऊन संघाता सुरक्षा द्यावी लागली. बीसीसीआयने चंदीगड पोलिसांचे नऊ कोटी रुपये थकविल्याने टीम इंडियाला कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही. टीम इंडियासोबतच दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandigarh Police will not provide security to team India