केंद्रीय क्रीडा खात्याचा भारतीय ऑलिंपिक संघटनेस शह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

क्रीडा विकास समितीत नरिंदर बात्रा, अभिनव बिंद्राचा समावेश 
मुंबई - सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या तहहयात अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल संघटनेच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नरिंदर बात्रा यांना राष्ट्रीय क्रीडा विकाससंहिता समितीत स्थान देऊन केंद्रीय क्रीडा खात्याने भारतीय ऑलिंपिक संघटनेस शह दिला आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरुद्ध न्यायालयाने नव्या वर्षाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी निर्णय दिला होता. त्यानंतर काही तासांत ही समिती स्थापन करीत क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याच्या मार्गात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी पहिले पाऊल टाकले. या समितीत क्रीडा पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायम आक्रमक असलेला अभिनव बिंद्रा याची निवड केली आहे. बिंद्रा यांस जागतिक नेमबाजी संघटनेच्या क्रीडापटू समितीत काम करण्याचा अनुभव आहे; तर बात्रा जागतिक हॉकी संघटनेचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे अर्थात ते आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या घटनेस कोणताही धक्का न देता क्रीडा संघटनांना घटनेच्या चौकटीत आणतील, असेच मानले जात आहे. 

क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास अध्यक्ष असलेली ही समिती क्रीडा प्रशासनाचे स्वरूप, क्रीडा संघटना प्रशासनासमोरील प्रश्‍न, न्यायालयाने याबाबत दिलेले निर्णय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पद्धत याचा आढावा ही समिती घेईल. त्याद्वारे राष्ट्रीय क्रीडा विकाससंहिता तयार करण्याबद्दल सूचना करणार आहे. समितीत अंजू जॉर्ज, प्रकाश पदुकोण, नंदन कामत (वकिल), दीपा कर्माकरचे मार्गदर्शक विश्‍वश्‍वर नंदी, क्रीडा-पत्रकार विजय लोकापल्ली, क्रीडा खात्याचे सहसचिव यांचाही समावेश आहे. 

समितीच्या प्राधान्याचे मुद्दे
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनुसार पायाभूत चांगल्या प्रशासनाचे मुद्दे
राष्ट्रीय क्रीडा विकास विधेयकाचा मसुदा तयार करणे
२०११ च्या राष्ट्रीय क्रीडा विकाससंहितेचा अभ्यास

Web Title: Check IOA Union sports ministry