Chetan Sharma Controversy : एवढं होऊनही बीसीसीआय चेतन शर्मांना देणार शेवटची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chetan Sharma Controversy

Chetan Sharma Controversy : एवढं होऊनही बीसीसीआय चेतन शर्मांना देणार शेवटची संधी

Chetan Sharma Controversy : भारतीय निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा हे स्टिंग ऑपरेशन मधील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. चेतन शर्मा यांनी या व्हिडिओत अनेक बढाया मारणारी आणि वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. या वक्तव्यानंतर बीसीसीआय त्यांच्यावर मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात होती. शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ निवडीच्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर काही महिती दिली आहे. बीसीसीआय चेतन शर्मांच्या या स्टिंग ऑपरेशनकडे एक लूज टॉक या दृष्टीकोणातून पाहेत आहे. बीसीसीआय चेतन शर्मांवर कारवाई तर नक्कीच करणार आहे. मात्र त्यापूर्वी बीसीसीआय शर्मांना आपली बाजू मांडण्याची शेवटची संधी देखील देईल.

दरम्यान, चेतन शर्मा तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ निवडणार का याबाबत विचारताच बीसीसीआयमधील उच्च अधिकारी शर्मांच्या या कृतीवर नाराज असल्याचे सांगण्यात आले. याचबरोबर ही घटना भारतीय संघ, मीडिया आणि निवडसमिती यांच्यावर खूप खोलवर करणारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'आता या स्टिंग ऑपरेशननंतर कोणताही खेळाडू किंवा निवडसमिती सदस्य पत्रकारांना माहिती देण्यास धजावणार नाही. मग तो पत्रकार कितीही जवळचा असला तरी. कारण आता विश्वासघात झाला आहे.'

चेतन शर्मा यांनी जे काही खळबळजनक दावे केले आहेत ते सगळे यापूर्वीच क्रिकेट वर्तुळात चर्चेत आले होते. जरी त्यांनी नवे आणि खूप खळबळ उडवून देणारी माहिती दिली नसली तरी त्यांनी खेळाडूंचा विश्वास आणि आदर गमावला आहे.

बीसीसीआय अधिकारी म्हणाला, 'चेतन शर्मा खूप जास्त बोलले. कोणताही भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू त्यांच्याशी बोलत नाहीये. तुम्ही चेतन शर्मांशी राहुल द्रविड, विराट कोहली किंवा रोहित शर्मा सराव सत्रावेळी सार्वजनिकरित्या बोलताना दिसतोय का? चेतन शर्मा ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपदरम्यान एका कोपऱ्यात उभे असायचे. कोणीही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत नव्हते.'

(Sports Latest News)

हेही वाचा : वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...