Chetan Sharma Controversy: चेतन शर्माची हकालपट्टी! BCCI कारवाईच्या तयारीत, उचलले हे मोठे पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chetan Sharma Controversy

Chetan Sharma Controversy: चेतन शर्माची हकालपट्टी! BCCI कारवाईच्या तयारीत, उचलले हे मोठे पाऊल

Chetan Sharma Controversy : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनमधील खुलासेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कारवाईच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन शर्मा यांची खुर्ची जाणार जवळपास निश्चित झाली आहे. बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्याशी बोलून उत्तर मागितले आहे.

एका न्यूज चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी खेळाडूंचा फिटनेस, विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा वाद, रोहित शर्माचे भविष्य अशा अनेक मुद्द्यांवर खुलासे केले.

बीसीसीआयचे अधिकारी आता स्टिंग ऑपरेशनबाबत बोलण्यास टाळत आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार म्हणाले की बीसीसीआय लवकरच याबाबत अधिकृत निवेदन जारी करेल. यावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. चेतन शर्माने स्टिंग ऑपरेशनमध्ये असा खुलासा केल्याने केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

चेतन शर्माने खुलासा केला की, टीम इंडियातील खेळाडू इंजेक्शन घेऊन फिटनेस प्रमाणपत्र मिळवतात. यासोबतच चेतन शर्माने टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड आणि ड्रॉप करण्याबाबतही खुलासा केला. यासोबतच त्याने बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादाचाही खुलासा केला, ज्यामध्ये विराट कोहलीने सौरव गांगुलीवर आरोप केला की, त्याला न कळवता कर्णधारपदावरून हटवण्यात आले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 10 पॉईंट्समध्ये जाणून घ्या चेतन शर्मांनी केलेला मोठा कांड