Chetan Sharma : आयुष्य आता खूप कठिण... चेतन शर्मांनी अर्ध्या रात्री केलेली पोस्ट झाली व्हायरल

Chetan Sharma Tweet
Chetan Sharma Tweet esakal

Chetan Sharma Tweet : भारतीय वरिष्ठ संघाचे माजी निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा यांना बीसीसीआयने फेब्रुवारी महिन्यात आपल्या पदावरून डच्चू दिला होता. एका वृत्तवाहिनीवर चेतन शर्मा यांचे स्टिंग ऑपरेशन प्रसारित झाले होते. त्यात चेतन शर्मा यांनी संघाबाबतच्या अनेक गोपनीय बाबी उघड केल्या होत्या. या स्टिंग ऑपरेशननंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठा गदारोळ माजला होता. त्यांना तडकाफडकी पदावरून दूर करण्यात आले. यानंतर चेतन शर्मा अज्ञातवासात होते. मात्र आता त्यांना सोशल मीडिया पहिल्यांदाच पोस्ट करत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली.

Chetan Sharma Tweet
SRH vs RCB LIVE : आरसीबीने नाणेफेक तरी जिंकली, सामन्याचं काय होणार?

चेतन शर्मा यांनी अर्ध्या रात्री ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, 'आयुष्य आता खूप कठिण आहे. आपल्या जवळच्या आणि प्रीय व्यक्तींकडून कोणतीही आशा राहिलेली नाही. माता राणी माझ्यावर कृपा करेल अशी आशा आहे.' या ट्विटच्या कमेंट बॉक्समध्ये लोक चेतन शर्मांविषयी सहानुभूतीची व्यक्त करताना दिसत आहे.

Chetan Sharma Tweet
Rafael Nadal Retirement : राफेल नदाल करणार निवृत्तीची घोषणा? बोलावली पत्रकार परिषद

चेतन शर्मा हे स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक क्रिकेट प्लेयर्सविषयी बोलताना दिसले. ते फिटनेससाठी इंजक्शन घेतात. डोपिंग टेस्टमध्ये देखील ते पकडले जात नाहीत. ही इंजक्शन घेतल्यानंतर तुम्ही 80 टक्के फिट असला तरी 100 टक्के फिट होऊन जाता. या काही पेन किलर नाहीत. इंजक्शनमध्ये असे औषध असते जे डोपिंग टेस्टमध्ये पकडले जात नाही. या सर्व खेळाडूंचे बाहेरही डॉक्टर असतात. चेतन शर्मा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्यांच्याशी अर्धा अर्धा तास बोलत असतो अशा बढाया देखील मारल्या होत्या.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com