Chetan Sharma Resigns : चेतन शर्मांच्या जागी आता ओडिसाचा माजी क्रिकेटपटू 'निवडसमिती अध्यक्ष' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chetan Sharma Resigns SS Das interim chairman Of BCCI Selection Committee

Chetan Sharma Resigns : चेतन शर्मांच्या जागी आता ओडिसाचा माजी क्रिकेटपटू 'निवडसमिती अध्यक्ष'

Chetan Sharma Resigns : स्टिंग ऑपरेशन प्रकरणानंतर चेतन शर्मा यांनी बीसीसीआयच्या निवडसमिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा बीसीसीआय सचिव जय शहा यांनी स्विकारला आहे. चेतन शर्मांच्या राजीनाम्यामुळे भारतीय निवडसमितीचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. आता हे अध्यक्षपद निवडसमितीमधील अनुभवी माजी क्रिकेटपूट शिव सुंदर दास यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

ओडिसाचे शिव सुंदर दास यांनी भारताकडून 23 कसोटी सामने खेळले आहे. त्यात त्यांनी 1 हजार 326 धावा केल्या असून त्यांनी भारताकडून 4 वनडे सामने देखील खेळले आहेत. बीसीसीआयच्या निवडसमितीला आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी आणि तीन वनडे समन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करायची आहे.

या घडामोडीबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'चेतन शर्मा यांना राजीनामा देण्यासाठी कोणी सक्ती केली नव्हती. आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती नेमणार होते. मात्र चेतन शर्मांनी काल रात्री राजीनामाच दिला.

नक्कीच ही लाजीरवणी परिस्थीती आहे. मात्र ही वेळ देखील निघून जाईल. एसएस दास हे निवडसमिचीचे अंतरिम चेअरमन असतील. ते जोपर्यंत नवीन चेतन शर्मांच्या जागी नवीन नवडसमिती सदस्य निवडला जात नाही तोपर्यंत कार्यभार सांभाळतील.'

बीसीसीआयची सध्याची निवडसमिती

शिवसुंदर दास ( 23 कसोटी, 4 वनडे, 3 टी 20 सामने)

सुब्रोतो बॅनर्जी (1 कसोटी, 6 वनडे 59 प्रथम श्रेणी सामने)

सलिल अंकोला (1 कसोटी, 20 वनडे 54 प्रथम श्रेणी सामने)

श्रीधरन शरथ (139 प्रथम श्रेणी सामने, 116 लिस्ट A सामने)

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड ही रणजी ट्रॉफीची फायनल झाल्यानंतर करण्यात येण्याची शक्यता आहे. निवडसमितीचे अध्यक्षपद हे शिव सुंदर दास भुषवतील. बीसीसीआय 5 व्या निवडसमिती सदस्यासाठी जाहीरात काढतील.

(Sports Latest News)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

टॅग्स :CricketBCCIcontroversy