
Cheteshwar Pujara 100th Test : मी 100 कसोटी सामने खेळेन असे वाटले नव्हते... चेतेश्वर पुजारा हे काय म्हणाला?
Cheteshwar Pujara 100th Test : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आज आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या या खास सामन्यापूर्वी भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी चेतेश्वर पुजाराच्या 100 व्या कसोटीसाठी त्याला मानाची कॅप दिली. यानंतर चेतेश्वर पुजाराने आपल्या भावना व्यक्त केल्या.
चेतेश्वर पुजारा म्हणाला की, 'सुनिल गावसकर यांच्याकडून ही मानाची कॅप घेणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. सुनिल गावसकर हे माझे प्रेरणास्थान आहेत. मी युवा असताना मला भारताकडून खेळायचे होते. मात्र मी 100 कसोटी सामने खेळेन असे कधी वाटले नव्हते.'
पुजारा कसोटी क्रिकेटबद्दल म्हणाला की, 'कसोटी क्रिकेट खेळले हे माझे अंतिम ध्येय होते. कसोटी क्रिकेट तुम्हाला तुमच्या आयुष्यासरखं सतत आव्हान देत असतं. मी सर्व युवा खेळाडूंना सांगू इच्छितो, तुम्ही सगळ्यांनी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी कष्ट घ्या.'
भारताच्या या झुंजार फलंदाजाने आपली 100 कसोटी खेळताना पत्नी आणि कुटुंबांचे देखील आभार मानले. याचबरोबर पुजाराने बीसीसीआय आणि संघ सहकाऱ्यांचे त्याच्या प्रवासात खंबीरणे उभे राहिल्याबद्दल आभार मानले.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात एक बदल केला असून सूर्यकुमार यादवच्या ऐवजी श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे.