ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर भारी पडला पुजारा

गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पण अडचणींना घाबरेल तो चेतेश्वर पुजारा कसला. पुजाराने सगळ्या शंका कुशंकांना तोंडाने बकबक करून नव्हे तर बॅटने धावा करून सडेतोड उत्तर दिले.

मेलबर्न : काही माजी खेळाडूंनी समालोचन करताना त्याच्यावर टिका केली. पळण्याचा वेग कमी असल्याचे कारण देत संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दडपण आणले. इतकेच काय दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात वगळण्याचा धक्का त्याला सहन करावा लागला. पण अडचणींना घाबरेल तो चेतेश्वर पुजारा कसला. पुजाराने सगळ्या शंका कुशंकांना तोंडाने बकबक करून नव्हे तर बॅटने धावा करून सडेतोड उत्तर दिले. नॅथन लायनला पुढे सरसावत कडक ऑफ ड्राईव्ह मारून चालू मालिकेतील दुसरे शतक झळकावताना चेतेश्वर पुजाराने दाखवलेला संयम लक्षणीय आहे. 

राजकोटला लहानाचा मोठा झालेल्या चेतेश्वर पुजाराला पहिल्यापासून संयमाची देणगी लाभली. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर सारखे दिग्गज खेळाडू संघात असल्याने चेतेश्वरला भारतीय संघात जागा मिळवायला फार कष्ट करावे लागले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : 

INDvsAUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे घामटे काढणारा संयमाचा महामेरु

Web Title: cheteshwar pujara scores the slowest century in his test career