तंदुरुस्तीसाठी जिमऐवजी गेलची योगाला पसंती

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

वयाच्या 39 व्या वर्षी येत्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्याकरिता ताकदवान ख्रिस गेलने जिमपेक्षा योगाला प्राधान्य दिले आहे.

नवी दिल्ली : वयाच्या 39 व्या वर्षी येत्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्याकरिता ताकदवान ख्रिस गेलने जिमपेक्षा योगाला प्राधान्य दिले आहे.

दोन महिन्यांपासून तो जिमपासून दूर आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी गेल अधिक मेहनत घेत आहे. दिवसभर मैदानात राहिल्यानंतर सर्व ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी गेल अधिक वेळ योगा आणि त्यानंतर मसाज असा फॉर्म्युला वापरत आहे.

क्रिकेट हा मजेशीर खेळ आहे, पण जेव्हा विश्‍वकरंडक स्पर्धा येते, तेव्हा धावांचा ओघ वाढत जातो. माझ्याकडे चांगला अनुभव आहे, त्यामुळे काय करायला पाहिजे, हे मला माहीत आहे. सध्याच्या फलंदाजीवर मी समाधानी आहे. यात सातत्य राहणे महत्त्वाचे आहे, असे गेलने सांगितले. वय वाढते तेव्हा तुमचा तरुणपणा कमी होत असतो, पण माझ्यासाठी वयापेक्षा मन किती सक्षम आहे, हे महत्त्वाचे आहे. हा खेळ केवळ शरीरावरच आधारलेला नाही. मी गेले काही महिने जिममध्ये जाऊन तंदुरुस्तीसाठी प्रयत्न केलेले नाहीत, असे सांगून गेल म्हणतो, मी अनुभव आणि मनाची प्रबळता याचा वापर करतो. जेव्हा संधी मिळते तेव्हा चांगली विश्रांती घेतो, मसाज करून घेतो. मैदानावर आवश्‍यक असते तेवढी स्ट्रेचिंग करतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chris Gayle prefers Yoga over Gym for fitness ahead of Cricket World Cup 2019