ख्रिस गेलला घरच्या मैदानावर निरोप नाहीच

इंग्लंड-आयर्लंड मालिकेसाठी डच्चू
Chris Gayle
Chris Gayleesakal

अँटिग्वा : इंग्लंड व आयर्लंड(england v ireland ) यांच्याविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची(west indij) आज नववर्षाच्या मुहूर्तावर घोषणा करण्यात आली; परंतु त्यातून संघाचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याला वगळण्यात आले आहे.४२ वर्षीय गेलला त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना (फेरवेल) घरच्या मैदानावर खेळायचा असून त्यानंतर क्रिकेटला अलविदा करण्याचे संकेत त्याने यापूर्वीच दिलेले आहेत; परंतु आता घरच्या मैदानावरील या आगामी मालिकेतून गेलला डच्चू देण्यात आल्याने त्याला त्याच्या अखेरच्या सामन्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.(Chris Gayle retired in cricket in home pitch but this series gayle is not selected )

Chris Gayle
PKL : ट्रिपल हेडरचा थरारक अनुभव; तिन्ही सामने सुटले बरोबरीत

दरम्यान, दोन्ही देशांविरुद्ध जाहीर झालेल्या या मालिकेसाठी दुखापतीतून परतलेल्या किरॉन पोलार्डकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आलेले आहे. वेस्ट इंडिज संघ ८ ते १६ जानेवारीदरम्यान जमैकामधील ‘सबिना पार्क’ येथे आयर्लंडविरुद्ध तीनएकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळणार आहे. त्यानंतर सहा दिवसांनी लगेचच विंडीज संघाची २२ ते ३० जानेवारीदरम्यान बार्बाडोस येथील केनसिंग्टन ओव्हल येथील मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका नियोजित आहे.

वेस्ट इंडिजचा टी-२० संघ : किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पुरण, फॅबियन ॲलन (फक्त इंग्लंडविरुद्ध), ड्वेन ब्राव्हो (फक्त इंग्लंडविरुद्ध), रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, शाई होप, अकील हुसेन, जेसन होल्डर, ब्रँडन किंग, काइल मायर्स, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेपर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श ज्युनिअर.

Chris Gayle
PKL 2021 : U MUMBA नं 30 सेकंदात पलटलेला सामना अखेर बरोबरीत

आयर्लंडविरुद्ध संघ : किरॉन पोलार्ड (कर्णधार), शामराह ब्रूक्स, रोस्टन चेस, जस्टिन ग्रीव्हज, जेसन होल्डर, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, निकोलस पुरण, रोमॅरियो शेपर्ड, ओडियन स्मिथ, डेव्हन थॉमस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com