‘फुल’राणी पुन्हा फुलली

0saina_7.jpg
0saina_7.jpg

'मी आशा कधीही सोडली नव्हती. मला लढायचं होतं. पुन्हा एकदा जिंकण्याचा निर्धार पक्का होता', ही प्रतिक्रिया आहे ती गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवालची .२०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा असताना तिला पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या सर्वांवर मात करीत तब्बल १८ महिन्यांनंतर ती बॅडमिंटन कोर्टवर तितक्याच ताकदीनं उतरली आणि देशासाठी सुवर्णपदक पटकावलं. खरं तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात करिअर करणारा प्रत्येक खेळाडू जागतिक स्तरावर अव्वल यश पाहण्याचे स्वप्न पाहतो आणि त्यासाठी तो जगतही असतो. या वेळेस सायना ही हेच स्वप्न घेऊन मैदानात उतरली होती. 

ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्यानंतर सायनापुन्हा जागतिक स्तरावर खूप चमक दाखवू शकेल की नाही अशी साशंकता होती. कारण त्यानंतर तिला अनेक स्पर्धामध्ये अपेक्षेइतके यश लाभत नव्हते तसेच तिला तंदुरुस्तीच्या समस्यांनीही ग्रासले होते. तरीही तिने २०१२ ते २०१४ या कालावधीत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळविले. त्यामध्ये डेन्मार्क ओपन, इंडियन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आदी अनेक स्पर्धामधील विजेतेपदांचा समावेश होता. हे यश मिळविताना तिने कॅरोलिना मरीन, वाँग यिहान, वाँग शिक्सियन आदी आपल्या पारंपरिक प्रतिस्पध्र्यावर मात केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये तिने आपले गुरू गोपीचंद यांच्याशी फारकत घेतली. काही वेळा मतभेद निर्माण झाल्यानंतर ती दरी वाढू नये म्हणून वेळीच दूर होणे उचित असते. म्हणूनच सायनाने हैद्राबादऐवजी बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण यांच्या अकादमीत विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कटू वाटणारे निर्णय पुढे सुखावह असतात याचाच प्रत्यय सायनाला आला. अनेकांसाठी तिचा हा निर्णय अनपेक्षित होता मात्र काही वेळा भविष्याचा विचार करता असे निर्णय घेणे अनिवार्य असतात. घरापासून थोडेसे दूर राहताना खेळाडूंना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. तथापि काटय़ावाचून गुलाब नसतो तसेच ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवायचे असेल तर असे कष्ट आवश्यक असतात हे तिने ओळखले आहे. गोपीचंद यांच्यापासून दुरावल्यानंतर तिने विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. चीन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळवीत तिने ऐतिहासिक पराक्रम केला. ही स्पर्धाजिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.

ऑल इंग्लंड स्पर्धा ही बॅडमिंटन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी मिळणेदेखील खूप मोठी कामगिरी मानली जाते. यंदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना सायना हिने उत्तुंग झेप घेतली. दुर्दैवाने अंतिम सामन्यात तिला पराभवास सामोरे जावे लागले. तरीही या स्पर्धेतील उपविजेतेपद ही तिच्या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ कामगिरी आहे. परंतु मागील काही वर्षांपासून तिला म्हणावे असे यश येत नव्हते. २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमधून दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमध्येच बाहेर पडली. त्यानंतर सायनाचे करिअर संपल्याच्या चर्चा सुरु झाल्या. काही दिवस गेल्यानंतर सायनान आपले पहिले गुरु गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी परतली. तिथे तिने जोरदार सर्व सुरु केला. सायना तशी  एकाग्रतेने सराव करण्याबाबत ख्यातनाम आहे. सराव सत्रास विनाकारण अनुपस्थितीत राहणे ती टाळते. सराव करतानाही आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा कार्यक्रमात शॉर्टकट न करता ती सतत सरावावर लक्ष केंद्रित करीत असते. सरावाची दिनचर्या कितीही कठीण असली तरी तक्रार न करता त्याप्रमाणे सराव करण्याबाबत सायना नेहमीच प्राधान्य देत असते. 

जवळपास १८ महिन्यानंतर सायना पूर्ण तंदुरुस्त होऊन बॅडमिंटन कोर्टवर राष्ट्रकुल स्पर्धेद्वारे उतरली. आणि फक्त उतरली नाही तर दोन सुवर्ण पदक जिंकले. या तिच्या कामगिरीने तिचे करिअर संपले अशी चर्चा करत होते त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या यशावर प्रतिक्रिया देताना म्हणाली की, '२०१६च्या पराभवानंतर मला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. परंतु, या टीकेचा मला फायदाच झाला. खेळताना जिथं, जिथं मी कमी पडत होते, त्यात सुधारणा करत गेले. गोपी सर आणि ख्रिस्तोफेर पेड्रा यांनी त्यासाठी मला खूप मदत केली. या साऱ्याचं फळ राष्ट्रकुलमध्ये मिळालं. या विजयामुळं मी खूष आहे. राष्ट्रकुल ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा असते. शिवाय, माझ्यासाठी ही स्पर्धा खूप महत्त्वाची होती. देशासाठी जिंकायचं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. ते पूर्ण झालं'. 

सायना खेळातील आपल्या चुकांचा स्वीकार करीत त्या लगेचच दुरुस्त कशा होतील यावरच तिचा सरावात भर असतो. आत्मपरीक्षणासारखा उत्तम गुरू नाही असे नेहमी म्हटले जाते. सायना याच तत्त्वाचा पाठपुरावा करीत असते. संयम, चिकाटी, महत्त्वाकांक्षा या गुणांच्या जोरावरच तिने आजपर्यंत सर्वोत्तम यश मिळविले आहे. शेवटच्या गुणापर्यंत प्रतिस्पर्धी खेळाडूला झुंज देण्याबाबत तिची ख्याती आहे. दडपणाखाली आपली कामगिरी खराब होणार नाही याबाबतही ती जागरूक असते. परिपूर्ण खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिच्या खेळात स्मॅशिंग, प्लेसिंग, कॉर्नरजवळ शटल टाकणे, समांतर फटके मारणे आदी विविधता आहे. संयम व शांत वृत्तीबाबत सायना नेहमीच आदर्श खेळाडू मानली जाते. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकून खेळातील आपल्या चुकांचा स्वीकार करीत त्या लगेचच दुरुस्त कशा होतील यावरच तिचा सरावात भर असतो. आत्मपरीक्षणासारखा उत्तम गुरू नाही असे नेहमी म्हटले जाते. सायना याच तत्त्वाचा पाठपुरावा करीत असते. संयम, चिकाटी, महत्त्वाकांक्षा या गुणांच्या जोरावरच तिने आजपर्यंत सर्वोत्तम यश मिळविले आहे. शेवटच्या गुणापर्यंत प्रतिस्पर्धी खेळाडूला झुंज देण्याबाबत तिची ख्याती आहे. दडपणाखाली आपली कामगिरी खराब होणार नाही याबाबतही ती जागरूक असते. परिपूर्ण खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिच्या खेळात स्मॅशिंग, प्लेसिंग, कॉर्नरजवळ शटल टाकणे, समांतर फटके मारणे आदी विविधता आहे. संयम व शांत वृत्तीबाबत सायना नेहमीच आदर्श खेळाडू मानली जाते. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकत आपल्यात ऑलिम्पिक पदक पुन्हा मिळविण्याची क्षमता आहे हे सायनाने दाखवून दिले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com