कधीकाळी विराटच्या टीममध्ये खेळला, आता फिक्सिंगमुळे जेलमध्ये गेला

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागने आज सी गौतम आणि अबरार अंजुम काजी यांना अटक केली आहे. या दोघांवर स्पॉट फिक्सिंग करुन 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. यातील अबरार अंजुम काजी हा ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये विराटच्या टीममध्ये खेळला आहे. 

बंगळूर : कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी आज दोन खेळाडूंना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागने आज सी गौतम आणि अबरार अंजुम काजी यांना अटक केली आहे. या दोघांवर स्पॉट फिक्सिंग करुन 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. यातील अबरार अंजुम काजी हा ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये विराटच्या टीममध्ये खेळला आहे. 

INDvsBAN : धावा कर नाहीतर.. गावसकरांची 'या' प्रमुख खेळाडूलाच धमकी

अबरारने 11 मे, 2011मध्ये पहिला ट्वेंटी20 सामना खेळला होता. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघात सहभागी होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात तो खेळला होता. त्याने या सामन्यात 2 षटकांमध्ये 21 धावा दिल्या होत्या. 

CM Gautam captained Bellary Tuskers in the final of Karnataka Premier League 2019 (PTI Photo)

अबरारने 28 फेब्रुवारी, 2019ला केरळविरुद्ध अखेरचा ट्वेंटी20 सामना खेळला होता. या सामन्यात तो नागालॅंडकडून खेळला होता आणि त्याने 14 धावा केल्या होत्या. त्याने आठ ट्वेंटी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 206 धावा केल्या असून दोन विकेट घेतल्या आहेत. 

Image result for Abrar Kazi

रहाणेने शेअर केला मुलीचा गोंडस फोटो; ठेवले 'हे' नाव

अबरारने 17 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 1044 धावा केल्या आहेत आणि 48 विकेट घेतल्या आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Gautam Abrar Kazi arrested in Karnataka Premier League for match fixing