द्रविडच्या बचावासाठी प्रशासकीय समितीचे रघुरामन राजन यांचे उदाहरण 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

मुंबई :  राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा प्रमुख राहुल द्रविडवर करण्यात आलेल्या दुहेरी हितसंबंधाच्या आरोपावर लढण्यासाठी द्रविडला प्रशासकीय समितीचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. बीसीसीआयचे निती अधिकारी डीके जैन यांच्यासमोर द्रविडने आपली बाजू मांडली त्याच वेळी प्रशासकीय समितीने रिझर्व बॅंकेचे माजे गव्हर्नर रघुरामन राजन यांचे उदाहरण सादर केले. 

मुंबई :  राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा प्रमुख राहुल द्रविडवर करण्यात आलेल्या दुहेरी हितसंबंधाच्या आरोपावर लढण्यासाठी द्रविडला प्रशासकीय समितीचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. बीसीसीआयचे निती अधिकारी डीके जैन यांच्यासमोर द्रविडने आपली बाजू मांडली त्याच वेळी प्रशासकीय समितीने रिझर्व बॅंकेचे माजे गव्हर्नर रघुरामन राजन यांचे उदाहरण सादर केले. 

नवोदित क्रिकेटपटू घडवण्याबरोबर सिनियर खेळाडूंच्याही प्रगतीवर लक्ष ठेवणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीच्या अध्यक्षपदी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने द्रविडची नियुक्ती केलेली आहे त्याने कार्यभारही स्वीकारलेला आहे पण मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजिवन सदस्य संजय गुप्ता यांनी द्रविडच्या दुहेरी हितसंबंधाचा आरोप केला. द्रविड आयपीएलचे फ्रॅंचाईस चेनई सुपर किंग्जच्या इंडिया सिमेंटमध्ये उपाध्यक्ष आहे. 

राष्ट्रीय अकादमी प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात आपण इंडिया सिमेंटमधून बिनपगारी सुट्टी घेणार आहोत असे द्रविडने अगोदरच जाहीर केलेले आहे त्याचबरोबर आज जैन यांच्यासमोर आपली बाजू मांडताना याचा पुनरुच्चारही केला. द्रविडचे समर्थन करताना प्रशासकीय समितीचे आणि कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय यांनी दोन उहारणे दिली. एका कंपनीतून जर बिनपगारी सुट्टी घेतली तर दुहेरी हितसंबंधाचा प्रश्‍नच येत नाही, असे त्यांनी सांगितले. 

रघुरामन राजन हे रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर असताना त्यांनी शिकागो विद्यापीठातील आपल्या शिक्षकाच्या जबाबदारीतून सुट्टी घेतली होती. तसेच निती आयोगाचे माजी कार्याध्यक्ष अरविंद पनागारिया या पदावर असताना कोलंबिया विद्यापीठातून कोणतेही मानधन घेत नव्हते, असे राय यांनी निती अधिकारी डीके जैन यांना लेखी दिले आहे. 

प्रशासकीय समितीने लेखी स्वरुपात आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी जैन यांनी द्रविडला त्याचे मत मांडण्यास सांगितले, परंतु द्रविडला कोणत्या तरी एका जबाबदारीतून मुक्त होण्यास जैन आग्रही असतील अशी शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COA gives full support to Rahul Dravid by giving example of Raghuram Rajan