पदक गमावले; आदर कमावला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

गोल्ड कोस्टच्या करॅरा स्टेडियमवर चारशे मीटर शर्यतीत सहाव्या लेनमधून धावणाऱ्या भारताच्या महंमद अनसवर सर्वांच्या नजरा होत्या. त्याने भन्नाट धावही घेतली आणि राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. त्याने आपल्या कामगिरीने क्रीडाप्रेमींची मने जिंकली. मात्र, तो ऐतिहासिक पदक काही जिंकू शकला नाही. ०.२० सेकंदांनी त्याचे ब्राँझपदक हुकले. 

तो पदक जिंकण्यात यशस्वी झाला असता तर तब्बल ६० वर्षांनंतर मिल्खासिंगनंतर ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारा पहिला पुरुष धावपटू ठरला असता. अनसने ४५.३१ सेकंद वेळ नोंदविताना स्वतःचाच ४५.३२ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम इतिहासजमा केला. 

पुरुषांच्या शर्यतीपूर्वी पावसात झालेल्या महिलांच्या चारशे मीटर उपांत्य फेरीत भारताच्या हिमा दासने क्रीडाप्रेमींना आनंद साजरा करण्याची संधी दिली. आसामच्या एका खेडेगावातील असलेल्या १८ वर्षीय हिमाने उपांत्य फेरीत ५१.५३ सेकंद अशी कारकिर्दीतील सर्वोत्तम वेळ देताना तिसरे स्थान मिळविले. यामुळे ती ऑस्ट्रेलियाच्या ॲनालिसे रुबीसोबत ‘फास्टेस्ट लुझर’ म्हणून अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. विशेष म्हणजे अनसप्रमाणे हिमाही सहा लेनमध्ये होती. 

Web Title: common wealth games mohammad anas