मुष्टीयुद्धमध्ये मेरी कोमचा 'सुवर्ण' पंच

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

गौरव सोळंकीला सुवर्ण
मुष्टीयुद्धात गौरव सोळंकी यानेही 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी केली. गौरवने नॉर्थन आयर्लंडच्या ब्रँडन इरवीनचा पराभव केला.

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज (शनिवार) दहाव्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरुच असून, भारताची अव्वल मुष्टीयोद्धा मेरी कोमने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धांमधील मेरी कोमचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. मेरी कोमने नॉर्थन आयर्लंडच्या क्रिस्टीना ओकोहाराचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. अंतिम लढतीत पाच राऊंड खेळण्यात आले. या सर्व राऊंडमध्ये मेरी कोमने वर्चस्व राखले. सुपर मॉम अशी ओळख असलेल्या मेरी कोमच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल देशभरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

गौरव सोळंकीला सुवर्ण
मुष्टीयुद्धात गौरव सोळंकी यानेही 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी केली. गौरवने नॉर्थन आयर्लंडच्या ब्रँडन इरवीनचा पराभव केला.

अमित पोंगलला रौप्य
मुष्टीयुद्धात भारताला आज तिसरे पदक अमित पोंगलने मिळवून दिले. त्याने 46 ते 49 वजनी गटात रौप्यपदक मिळविले. 22 वर्षीय अमितने इंग्लंडच्या गलाल याफाईचा पराभव केला.

Web Title: Commonwealth Games boxers Mary Kom, Gaurav Solanki win gold medal