संजिता चानूने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळाले. संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरे सुवर्ण मिळवले. 2014मध्ये ग्लासगोत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीने 48 किलो वजनी गटात भारतासाठी सुवर्ण मिळवले होते.

संजिता चानूने 192 किलो किलो वजन उचलत भारताला सुवर्ण मिळवून दिले, हा विश्वविक्रम ठरला आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकासह तीन पदकांची कमाई केली.

पपुआ न्यू गिनीच्या लोआ टुआला रौप्यपदक मिळाले असून, तिने एकूण 182 वजन उचलले. तर कॅनडाच्या रॅचेल बेझिनेट हिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तिने 181 किलो वजन उचलले. केवळ एक किलो वजन कमी उचलल्यामुळे ती तिसऱ्या क्रमांकावर आली. 

या स्पर्धेत यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्ण पदक मिळवले होते. 

Web Title: Commonwealth Games Weightlifter Sanjita Chanu wins India’s second gold medal