भ्रष्टाचारविरोधी पथकाचे मार्शल सरव्यवस्थापक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या (अँटी-करप्शन युनिट-एसीयू) सरव्यवस्थापकपदी ऍलेक्‍स मार्शल यांची नियुक्ती केली आहे. ते 55 वर्षांचे असून "कॉलेज ऑफ पोलिसिंग'चे मुख्य कार्यवाह आहेत. इंग्लंड आणि वेल्समधील पोलिसांची ही व्यावसायिक संस्था आहे. ते सप्टेंबरमध्ये "आयसीसी'मध्ये दाखल होतील. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून गुन्हा व गुन्हेगारीविषयक शास्त्राची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. "रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज'मध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण घेतले आहे. "एसीयू'चे अध्यक्ष सर रॉनी फ्लॅनागन यांनी सांगितले, "मार्शल यांनी पोलिस क्षेत्रात उल्लेखनीय कारकीर्द घडविली आहे. त्यांच्यामुळे क्रिकेटमधील भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यास आणखी बळकटी येईल.' मार्शल हे "एसीयू'वरील चौथे सरव्यवस्थापक असतील. यापूर्वी जेफ रीस (2000-08), रवी सावनी (08-11) व योगेंद्र पाल सिंग (11 ते 17) यांनी हे पद भूषविले आहे.
Web Title: corruption oppose team Marshall General Manager