असंलग्न खेळांचा खर्च सरकार करणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : भारतात काही खेळांना अजूनही भारतीय ऑलिंपिक संघटनेचे संलग्नत्व नाही, मात्र त्या खेळातील संघ आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत जाणार आहेत. अशा खेळातील खेळाडूंचा पोशाखाचा सर्व खर्च क्रीडा मंत्रालय उचलणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. 

भारतीय ऑलिंपिक संघटनेने सुरवातीला या खेळांना पुढील आशियाई स्पर्धेपासून संघ पाठवायचे निश्‍चित केले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांनी अशा खेळांच्या महासंघांना आशियाई स्पर्धेसाठी स्पर्धा पोशाख, उद्‌घाटन-समारोप सोहळा पोशाख आणि प्रशिक्षण असा सर्व खर्च करण्यास सांगितला. 

क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांना ही माहिती समजल्यावर त्यांनी आशियाई स्पर्धेसाठी कुठल्याही खेळाडूला पैसा खर्च करावा लागणार नाही, अशा आशयाचा आदेश दिला. हे खेळाडू भारतासाठी खेळत आहेत आणि भारतासाठी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा पोशाख आणि क्रीडा साहित्याचा खर्च क्रीडा मंत्रालयाकडून उचलला जाईल, असेही त्यांनी आपल्या आदेशात पुढे म्हटले आहे. 

विशेष म्हणजे "आयओए'ने खेळाच्या सराव शिबिरावर अधिक खर्च झाल्यामुळे असंलग्न खेळांच्या खेळाडूंचा खर्च सहन करण्यास तयार नव्हते. त्यांनी या खेळाच्या महासंघांना आगाऊ रक्कम भरण्याचेही आदेश दिले होते. मात्र, क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाने आता या खेळातील 83 खेळाडूंना दिलासा मिळाला आहे. 
 
असंलग्न खेळ कोणते 
साम्बो, पेनसॅक सिलट, कुराश, ब्रिज, सॉफ्ट क्‍लायबिंग, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, सेपकटकरॉ हे आठ खेळ असंलग्न आहेत. 

किती येणार खर्च 
उद्‌घाटन आणि समारोप सोहळ्यातील पोशाख : 10,910 रुपये 
प्रशिक्षण आणि क्रीडा साहित्य : 18 ते 22 हजार दरम्यान प्रत्येक खेळाडूमागे 
(क्रीडा साहित्य निर्मिती : ली निंग, चीन) 

Web Title: The cost of unattractive games will be made by the government