मोठी बातमी : ऑस्ट्रेलियामध्ये तृतीयपंथीय क्रिकेटला अधिकृत दर्जा

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट नेहमीच आपल्या अनेक कृत्यांमुळे जगासमोर चांगली उदाहरणे ठेवत असते. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्यासही ऑस्ट्रेलियानेच प्रथम सपरवात केली होती. आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने तृतीपंथीय क्रिकेटला अधिकृत दर्जा दिला आहे. 

सिडनी : ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट नेहमीच आपल्या अनेक कृत्यांमुळे जगासमोर चांगली उदाहरणे ठेवत असते. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्यासही ऑस्ट्रेलियानेच प्रथम सपरवात केली होती. आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने तृतीपंथीय क्रिकेटला अधिकृत दर्जा दिला आहे. 

ऑक्टोबरमध्ये सुरवात केलेल्या बोलणीला आज अखेर अधिकृत स्वरुप आले. या धोरणामुळे ऑस्ट्रेलियामध्ये आता तृतीयपंथीयांना सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळता येणार आहे. 

तृतीयपंथीयांनाही आता सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली हे अत्यंत योग्य झाले. त्यांना योग्य आणि सर्वोत्तम वागणूक मिळेल याची मला खात्री आहे. 
- मेगन शूट, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

आयसीसीच्या लिंगावरुन होणारी पात्रता या अटींबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया तृतीयपंथीय खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. यामुळे त्यांना अधिकृतरित्या क्रिकेट खेळता येणार आहे. तसेच त्यांच्यासाठी एक समितीही स्थापऩ केली जाणार आहे. ही समिती अर्थपूर्ण आणि स्पर्धात्मक वातावरणात क्रिकेट खेळले जाईल. तसेच या खेळाडूंचा कोणत्याही प्कराचा छळ होणार नाही याची जबाबदारी घेईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricket Australia Announces New Transgender Policy