क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांचा राजीनामा 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

माजी अकाउंटंट आणि मध्यम वेगवान गोलंदाज सदरलँडने प्रथम श्रेणी सामने खेळले असून 1998 मध्ये ते क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे महाव्यवस्थापक बनले. तीन वर्षांनंतर ते मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.

मेसबर्न : क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेम्स सदरलँड यांनी आज (बुधवारी) पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. 17 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सदरलँड हे पद सोडणार आहेत.

राजीनामा देताना जेम्स सदरलॅंड यांनी आज सांगितले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात झालेल्या बॉल टॅम्परिंग आणि खेळाडूंच्या वेतन करारावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपण राजीनामा देत आहोत.

मुख्य कार्यकारी सदरलँडने यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 12 महिन्यांची नोटीस दिली असून जोपर्यंत त्यांना योग्य पर्याय मिळत नाही तोपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. सदरलँड म्हणाले, कि जवळपास २० वर्षाच्या सेवेनंतर आठ थांबण्याची ही योग्य वेळ आहे. मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या कसोटीदरम्यान माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व फलंदाज कॅमरुन बँक्रॉफ्ट यांना बॉल टॅम्परिंगबद्दल दोषी ठरविण्यात आले. त्यावेळी जेम्स सदरलँड यांच्यावर राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव होता. परंतु तत्कालीन प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी राजीनामा दिल्यामुळे सदरलँड पदावर कायम राहिले . 

ते म्हणाले, "त्या वेळी तो एक मोठा मुद्दा होता परंतु जेव्हा आपण एका मोठ्या खेळाच्या मुख्य कार्यकारी पदावर कार्य करीत असता तेव्हा अशा गोष्टी नेहमीच घडत असतात. त्या घटनेमुळे मी हा निर्णय घेतलेला नाही. "

माजी अकाउंटंट आणि मध्यम वेगवान गोलंदाज सदरलँडने प्रथम श्रेणी सामने खेळले असून 1998 मध्ये ते क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे महाव्यवस्थापक बनले. तीन वर्षांनंतर ते मुख्य कार्यकारी अधिकारी बनले.

Web Title: Cricket Australia chief James Sutherland to stand down