Virat Kohli: शुभ मंगल सावधान! विराटच्या बिचाऱ्या फॅनची भीष्मप्रतिज्ञा पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

Virat Kohli: शुभ मंगल सावधान! विराटच्या बिचाऱ्या फॅनची भीष्मप्रतिज्ञा पूर्ण

Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा जुन्या लय मध्ये आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या होम वनडे मालिकेत कोहलीने दोन शतके झळकावली आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. कोहलीची मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात एका चाहत्याता सुरक्षा घेरा तोडून विराटला भेटला. सामन्याच्या एका दिवसानंतर आणखी एका चाहत्याने असा एक फोटो शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Babar Azam Leaked Video: 'बाबरने मला प्रेग्नेंट केले अन्...' महिलेने पाकिस्तानच्या कर्णधारावर केला गंभीर आरोप

त्या चाहत्याचे नाव अमन अग्रवाल आहे. त्याने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. एक फोटो 10 एप्रिल 2022 चा आहे आणि दुसरा 15 जानेवारी 2023 चा आहे. आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचमध्ये हा चाहता पोस्टर घेऊन आला होता, ज्यामध्ये लिहिले होते की जोपर्यंत विराट त्याचे 71 वे शतक पूर्ण करत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही.

हेही वाचा: Robin Uthappa: उथप्पाचा दुबईमध्ये तांडव! 12 चेंडूत ठोकल्या 52 धावा

विराट कोहलीने त्याच्या लग्नाच्या दिवशी त्याचे 74 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. अमनने विराटच्या शतकानंतर एक फोटो शेअर केला. ज्यात एका फोटोमध्ये तो पोस्टर बरोबर फोटो आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो शेरवानी परिधान घालुन टीव्ही स्क्रीनसमोर उभा आहे. टीव्हीवर विराट त्याचं 74 वं शतक साजरं करताना दिसत आहे.

हेही वाचा: Maharashtra Kesari Controversy: ''व्हिडिओ उगाच व्हायरल झाला नाही...; पुन्हा येणार अन्...''

नोव्हेंबर 2019 नंतर विराटचे आंतरराष्ट्रीय शतक जवळपास तीन वर्षानंतर म्हणजे 8 सप्टेंबर 2022 ला 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. विराटच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.