गोलंदाजांची कमाल; भारताचा 304 धावांनी विजय

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जुलै 2017

गॉल: अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या आणि दुखापतींनी घेरलेल्या श्रीलंकेच्या संघाने अखेर भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या चौथ्याच दिवशी नांगी टाकली. 550 धावांच्या अशक्‍यप्राय आव्हानासमोर श्रीलंकेचा दुसरा डाव 245 धावांत संपुष्टात आला. रवींद्र जडेजा आणि आर. आश्‍विन या फिरकी गोलंदाजांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताने 304 धावांनी विजय मिळविला.

सामना सुरू होण्यापूर्वीपासून सुरू झालेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंचे दुखापतीचे सत्र प्रत्यक्ष सामन्यातही सुरूच राहिले. कर्णधार रंगना हेराथ आणि असेला गुणरत्ने यांना झालेल्या दुखापतीमुळे हे दोघेही फलंदाजीसाठी मैदानात उतरले नाहीत. त्यामुळे भारताला विजयासाठी आठच गडी बाद करण्याची गरज होती. दुसऱ्या डावात भारताने 77 षटकांत ही कामगिरी पूर्ण केली.

श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्ने आणि निरोशन डिकवेला या दोघांनीच थोडीफार झुंज दिली. करुणारत्ने 97 धावांवर बाद झाला, तर डिकवेलाने 67 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज दडपणाखाली बाद झाले.

भारताकडून रवींद्र जडेजा आणि आर. आश्‍विन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. महंमद शमी आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

धावफलक :
भारत : पहिला डाव : 600
श्रीलंका : पहिला डाव : 291
भारत : दुसरा डाव : 3 बाद 240 घोषित
श्रीलंकेसमोर विजयासाठी 550 धावांचे आव्हान
श्रीलंका : दुसरा डाव : सर्वबाद 245
दिमुथ करुणारत्ने 97, कुशल मेंडिस 36, निरोशन डिकवेला 67, दिलरुवान परेरा 21

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: cricket news India crush Sri Lanka for biggest overseas win