भारताचे श्रीलंकेसमोर 322 धावांचे आव्हान; श्रीलंका 34/1

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जून 2017

सध्या सुखद "फॉर्मा'त असलेल्या रोहित शर्मा (78 धावा, 79 चेंडू) व शिखर धवन (125 धावा, 128 चेंडू) या सलामीवीरांनी रचलेल्या भक्कम पायाच्या जोरावर चॅम्पियन्स करंडकामध्ये भारताने आज (गुरुवार) श्रीलंकेसमोर धावांचे 322 आव्हान उभे केले.

लंडन - सध्या सुखद "फॉर्मा'त असलेल्या रोहित शर्मा (78 धावा, 79 चेंडू) व शिखर धवन (125 धावा, 128 चेंडू) या सलामीवीरांनी रचलेल्या भक्कम पायाच्या जोरावर चॅम्पियन्स करंडकामध्ये भारताने आज (गुरुवार) श्रीलंकेसमोर धावांचे 322 आव्हान उभे केले. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकन संघाची खराब सुरुवात झाली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा श्रीलंकेने आठ षटकात एक बाद 34 धावा केल्या आहेत.

एकीकडे कर्णधार विराट कोहली हा भोपळाही न फोडता परतला; तर त्यानंतर आलेल्या युवराज सिंह (7 धावा, 18 चेंडू) यालाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. परंतु एकीकडून पडझड होत असताना धवन याने स्थिरचित्ताने खेळत धावांचा ओघ आटू दिला नाही. युवराज बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या महेंद्रसिंह धोनी (63 धावा, 52 चेंडू) याने भारतीय डावास आकार दिला. याशिवाय, धोनी याने धवन बाद झाल्यानंतर केदार जाधव (नाबाद 25 धावा, 13 चेंडू) यांच्याबरोबर भारतीय आव्हान तीनशे धावांपलीकडे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याआधीच्या सामन्यात आक्रमक फटकेबाजी केलेल्या हार्दिक पांड्या (9 धावा, 5 चेंडू) याला या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. मात्र जाधव याने अखेरच्या षटकात दोन चौकार व एका षटकारासह धावसंख्या 321 पर्यंत पोहोचविले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी केलेल्या दिशाहीन गोलंदाजीमुळे भारतीय आव्हान आणखी मोठे करण्यात फलंदाजांना यश आले.

या स्पर्धेमध्ये भारताने याआधी पाकिस्तानला पराभूत केले असून हा सामनाही जिंकल्यास भारत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होईल.

Web Title: cricket news marathi news ind vs shrilanka dhoni