Warner Williamson Photo | वॉर्नर-विल्यमसनच्या 'या' फोटोने जिंकली क्रिकेट फॅन्सची मनं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

David-Warner-Kane-Williamson

वॉर्नरने सहकारी विल्यमसनसाठी एक खास संदेशही लिहिला

वॉर्नर-विल्यमसनच्या 'या' फोटोने जिंकली क्रिकेट फॅन्सची मनं

ऑस्ट्रेलियाच्या संघाने टी० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले आणि विश्वविजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने १७२ धावा केल्या होत्या. कर्णधार केन विल्यमसनने एकहाती झुंज देत ८७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरने ५३ तर मिचेल मार्शने नाबाद ७७ धावा करत संघाला टी२० चॅम्पियन बनवलं. या सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नरने विल्यमसनसोबत एक फोटो शेअर केला आणि त्या फोटोने क्रिकेटरसिकांची मनं जिंकली.

हेही वाचा: T20 WC: बाबरचं 'त्रिशतक' पाण्यात; वॉर्नर ठरला मॅन ऑफ द सीरीज!

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघाने २०१५च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यात त्यांना उपविजेतेपद मिळाले. त्यानंतर २०१९च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम याच संघाला इंग्लंडने पराभूत केले. आता २०२१मध्येही विल्यमसनच्या नेतृत्वाखाली त्यांनी टी२० विश्वचषकात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. असे असूनही केन विल्यमसनच्या चेहऱ्यावर कुठेही द्वेष किंवा ईर्ष्या दिसून आली नाही. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याचे साऱ्यांनीच खुल्या मनाने कौतुक केले. असे असतानाच डेव्हिड वॉर्नरनेही त्याला मिठी मारल्याचे एक फोटो पोस्ट केला. त्यात त्याने विल्यसमनला Legend म्हणजे महान खेळाडू म्हणत त्याचा गौरव केला. या फोटो आणि कॅप्शनने क्रिकेट चाहत्यांची मनंदेखील जिंकली.

हेही वाचा: Video: बोल्टची 'स्मार्ट' गोलंदाजी... वॉर्नरचा उडवला त्रिफळा!

हेही वाचा: Video : विल्यमसनचा एक कॅच सोडणं ऑस्ट्रेलियाला पडलं भारी

दरम्यान, केन विल्यमसनने अंतिम सामन्यात न्यूझीलंडसाठी एकाकी झुंज दिली. त्याने सुरुवातीच्या २१ चेंडूत केवळ २१ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याचा एक झेल जोश हेजलवूडने सोडला. त्या जीवदानाचा त्याने फायदा घेत ३२ चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर तीच लय पुढे कायम राखत त्याने ४८ चेंडूत ८७ धावांची दमदार खेळी केली. तब्बल १० चौकार आणि ३ षटकारांनी त्याने आपली खेळी सजवली.

loading image
go to top