धमाकेदार ट्रेलरनंतर इंग्लंडसाठी सुरु होणार खरी कसोटी

आता त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघांचे आव्हान असणार आहे.
England vs Bangladesh
England vs Bangladesh sakal
Summary

आता त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघाचे आव्हान असणार आहे.

T20 World Cup 2021, England vs Bangladesh : इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवत स्पर्धेतील आपली दावेदारी भक्कम केली आहे. पहिल्या सामन्यात दोनवेळच्या टी-20 वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या वेस्ट इंडीजला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी बांगलादेशला पराभूत केले. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशच्या फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांसमोर नांगी टाकली. त्यांना निर्धारित षटकात 9 बाद 124 धावांपर्यंतच मजल मारता आली.

अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि जोस बटलरने संघाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर 39 धावा असताना बटलरच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. नसुम अहमदने नईमकरवी त्याला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 18 धावा केल्या. सलामीवीर जेसन रॉयने डेविड मलानच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची दमदार भागीदारी केली.

England vs Bangladesh
'खेलरत्न' शिफारस: गोल्डन बॉयसह मिताली, सुनील छेत्रीही शर्यतीत

ही जोडीच इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल, असेच काहीचे चित्र दिसत होते. पण शैौरिफुल इस्लामने जेसन रॉयच्या रॉयल खेळीला ब्रेक लावला. जेसन रॉयने 38 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. तो माघारी फिरल्यानंतर डेविड मलान 25 चेंडूत नाबाद 28 धावा आणि जॉनी बेयरस्ट्रो नाबाद 8 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

England vs Bangladesh
भारत-पाकच्या खेळाडूंबद्दल हेडनने व्यक्त केले मत; म्हणाला...

सलग दुसऱ्या विजयासह इंग्लंडचा संघ सुपर 12 मधील ग्रुप 1 मध्ये टॉपला पोहचला आहे. आता त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या संघाचे आव्हान असणार आहे. इंग्लंडचा संघ कामगिरीतील सातत्य कायम राखून या संघाविरुद्ध विजयी मालिका कायम राखण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. 2019 मध्ये घरच्या मैदानावर वर्ल्ड चॅम्पियन होणाऱ्या इंग्लंडच्या संघाला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी आता मोठ्या संघासोबत तगडी फाईट द्यावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com