Video : चुकीला माफी नाही; मैदानातील खुन्नस पडली महागात!

श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरु कुमारा आणि बांगलादेशचा सलामीचा फलंदाज लिटन दास यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले
Liton Das and Lahiru Kumara
Liton Das and Lahiru Kumara T20 World Cup Twitter

T20 World Cup 2021, Lahiru Kumara and Liton Das fined : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या गटात असलेल्या बांगलादेश आणि श्रीलंका संघातील खेळाडूंवर आयसीसीने शिस्तभंगाची कारवाई केली आहे. रविवारी दुपारच्या सत्रात शारजाच्या मैदानावर सुपर 12 मधील पहिल्या गटातील बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना झाला. सलामीवीर रहिम आणि नईमच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशनं श्रीलंकेसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने असलंकाच्या 80 धावा आणि भानुका राजपक्षाने केलेल्या 53 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर 5 गडी राखून विजय नोंदवला होता.

या सामन्यात श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरु कुमारा आणि बांगलादेशचा सलामीचा फलंदाज लिटन दास यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशच्या डावातील 6 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर लिटन दास बाद झाला. बांगलादेशच्या पहिल्या विकेटनंतर लाहिरु कुमारा लिटन दासला उद्देशून काहीतरी बोलला. त्याला लिटन दासनेही प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी आयसीसीने दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई केलीये.

Liton Das and Lahiru Kumara
जिंकूनही असमाधानी! पाक पत्रकारानं पेटवलं धर्मयुद्ध

लाहिरु कुमारा याला मानधनाच्या 25 टक्के दंड आकारण्यात आला असून लिटन दासला 15 टक्के दंड ठोठावण्यात आलाय. आयसीसीच्या नियमालीचे उल्लंघन केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे आयसीसीच्या नियमालीतील 2.5 नुसार लाहिरु कुमाराला दोषी ठरवण्यात आले. दुसरीकडे 2.20 च्या नियमानुसार लिटन दासवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. दोघांनीही आपली चुक कबूल केली आहे.

Liton Das and Lahiru Kumara
T20 World Cup :शारजाच्या मैदानात अफगाणिस्तानची विक्रमी कामगिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com