T20 World Cup :शारजाच्या मैदानात अफगाणिस्तानची विक्रमी कामगिरी

अफगाणिस्तानने निर्धारित 20 षटकात 4 बाद 190 धावा केल्या.
AFG vs SCO
AFG vs SCO T 20 World Cup Twitter
Summary

अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना आतापर्यंत झालेल्या सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे.

T20 World Cup 2021, Afghanistan vs Scotland, 17th Match : अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना आतापर्यंत झालेल्या सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्लाह झझाई 44(30), मोहम्मद शहजाद या जोडीनं संघाच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावा केल्या.

AFG vs SCO
IPL च्या नव्या 2 टीम ठरल्या; BCCI मालामाल!

शहजाद 15 चेंडूत 22 धावा करुन माघारी फिरला. झझाईचे अर्धशतक अवघ्या 6 धावांनी हुकले. त्यानंतर रामानुल्लाह गुरबझ याने 37 चेंडूत केलेल्या 46 धावा आणि नजीबुल्लाह झादरनच्या 34 चेंडूतील 59 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने निर्धारित 20 षटकात 4 बाद 190 धावा केल्या. स्कॉटलंडकडून सफियान शरीफने सर्वाधिक 2 तर जोश दवे आणि मार्क वॅट यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

AFG vs SCO
जिंकूनही असमाधानी! पाक पत्रकारानं पेटवलं धर्मयुद्ध

अफगाणिस्तानने रचला इतिहास

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अफगाणिस्तानची ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे. शारजाच्या मैदानात त्यांनी 4 बाद 190 धावा केल्या. यापूर्वी 2016 मध्ये नागपूरच्या मैदानात त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध 6 बाद 186 धावा केल्या होत्या. याच स्पर्धेत मुंबईच्या मैदानात त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मुंबईच्या मैदानात 172 तर स्कॉटलंड विरुद्ध नागपूरच्या मैदानात 5 बाद 170 धावा केल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com