"तर मी स्वत:हून संघातून बाहेर होईन"; कर्णधाराचं रोखठोक मत

Captains
Captains
Summary

IPL मध्ये फारशी चांगली कामगिरी करण्यास अयशस्वी

IPL 2021 स्पर्धा नुकतीच संपली. या स्पर्धेत चेन्नईच्या संघाने अंतिम फेरीत कोलकाताला पराभूत केले. महेंद्रसिंग धोनीच्या अनुभवापुढे इयॉन मार्गनचे नेतृत्व फिके पडले. मॉर्गनच्या कामगिरीबाबत चिंतेची बाब म्हणजे मॉर्गनला यंदाच्या हंगामात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मॉर्गनने संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले, पण त्याला १७ सामन्यात केवळ १३३ धावाच करता आल्या. संपूर्ण स्पर्धेत त्याने ८ चौकार आणि ६ षटकार लगावले. तसेच संपूर्ण स्पर्धेत त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. अशा परिस्थितीत, कामगिरी न सुधारल्यास मी स्वत:ला संघातून वगळण्यासही मागे पुढे पाहणार नाही, असं रोखठोक भूमिका त्याने व्यक्त केली.

"मी माझ्या प्रत्येक मुलाखतीत विविध विषयांवर बोलत असतो. त्यात मी स्वत:च्या कामगिरीबद्दलही बोलत असतो. कामगिरी सुधारत नसेल तर मी स्वत:ला नक्कीच संघातून वगळण्याचा निर्णय घेईन. तो पर्याय मी कायमच खुला ठेवला आहे. मी माझ्या संघाच्या विजेतेपदामध्ये अडथळा ठरणार नाही. माझी फलंदाजी सध्या थोडीशी खराब होत आहे, पण मी कर्णधार म्हणून माझ्या संघाला पूर्ण न्याय देत आहे. पण असं असलं तरीही मी माझी कामगिरी सुधारू शकलो नाही तर मी नक्कीच माझ्या संघातून मला स्वत:लाच वगळेन", असं स्पष्ट मत मॉर्गनने व्यक्त केलं.

"टी२० हा खूपच वेगवान खेळ आहे. तुम्ही जितके प्रतिभावान असाल तितका तुमचा संघाला फायदा होतो. मी गोलंदाज नाही. माझं वयदेखील थोडंसं जास्त आहे. त्यामुळे मैदानात मी फिल्डिंगमध्ये १०० टक्के प्रयत्न करू शकत नसेन पण मी कर्णधार म्हणून माझ्या संघामध्ये विश्वास भरला आहे. त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो. पण तरीही फलंदाजीत मला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही तर मात्र मी नक्कीच स्वत:बद्दल कठोर निर्णय घेईन", असं वक्तव्य मॉर्गनने केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com