
इंग्लंड क्रिकेट संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यग्र आहे. त्यांनी नुकताच झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटी सामना एका डावाने जिंकला. आता त्यांना गुरुवारपासून (२९ मे) वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे. त्यानंतर २० जूनपासून इंग्लंडला भारताविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्यापूर्वी इंग्लंडची चिंता वाढली आहे.