

India vs New Zealand Mumbai Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून (१ नोव्हेंबर) कसोटी मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना मुंबईत सुरू होत आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
अशातच गुरुवारी आयपीएल २०२५ हंगामापूर्वीचे रिटेंशन पार पडणार आहे. त्यामुळे गुरुवारी प्रत्येक आयपीएल फ्रँचायझी आपल्या संघात कोणत्या खेळाडूंना कायम करणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळे या रिटेंशनबद्दल सध्या जोरदार चर्चा आहे.
याबाबत कोलकाता नाईट रायडर्सचा माजी मेंटॉर आणि सध्याचा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरलाही प्रश्न विचारण्यात आला, पण त्याने त्याला याच्याशी काही देणं घेणं नसल्याचे सांगितले आहे.