Rohit Sharma ने जिंकला आणखी एक पुरस्कार; गौतम गंभीरचं RO-KO बद्दल मोठं विधान, म्हणाला...

ROHIT SHARMA WINS IMPACT PLAYER OF THE SERIES: रोहित शर्माने मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सीरिज’ पुरस्कार पटकावला. निर्णायक सामन्यात केलेल्या दमदार शतकामुळे भारताला विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा राहिला.
ROHIT SHARMA WINS IMPACT PLAYER OF THE SERIES

ROHIT SHARMA WINS IMPACT PLAYER OF THE SERIES

esakal

Updated on

Rohit Sharma and Virat Kohli match-winning partnership : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून मालिकेचा शेवट गोड केला. ऑस्ट्रेलियाच्या २३७ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग भारताने ३८.३ षटकांत फक्त १ विकेट गमावून केला.रोहित शर्माने नाबाद १२१ धावांची खेळी करून चाहत्यांना खूश केले, तर विराट कोहलीच्या नाबाद ७४ धावांनीही स्टेडियम दणाणून सोडले. या दोन सीनियर्स खेळाडूंना गवसलेला सूर भारतीय चाहत्यांना सुखावणारा ठरला. ही दोघंही २०२७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहेत, परंतु फॉर्म व वय त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करतोय. पण, तिसऱ्या सामन्यातून या दोघांनी याचेही उत्तर दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com