

Vaibhav Sooryavanshi Wicket | Tilak Varma Catch | IPL 2026 | MI vs RR
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात रविवारी (२४ मे) अखेरचा साखळी सामना होत आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेला हा सामना मुंबई इंडियन्ससाठी स्पर्धेतील शेवटचा सामना आहे, तर राजस्थानसाठी निर्णायक सामना आहे.
जर या सामन्यात राजस्थान रॉयल्स जिंकले, तर ते प्लेऑफमध्ये पोहचतील, तर पराभूत झाले, तर त्यांच्यासाठीही हा अखेरचा सामना असेल. दरम्यान, या सामन्यात राजस्थानसाठी या सामन्याची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही.