Prithvi Shaw Selfie Controversy: पृथ्वी शॉचा सेल्फी वाद विकोपाला; मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithvi Shaw selfie controversy

Prithvi Shaw Selfie Controversy: पृथ्वी शॉचा सेल्फी वाद विकोपाला; मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई!

Prithvi Shaw Selfie Row : भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ आता चर्चेत आहे. पृथ्वीवर सेल्फीची मागणी करणाऱ्या आपल्याच चाहत्याशी झटापट केल्याचा आरोप झाला होता. याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या प्रकरणार दोन्हीकडून एकमेकांविरूद्ध आरोप प्रत्यारोप आणि तक्रारी दाखल झाल्या होत्या.

आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी रुद्र आणि साहिल नावाच्या 2 तरुणांना ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत एकूण 3 जणांना अटक, तर 5 आरोपी फरार आहेत. तर अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही घटना 15 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. जेव्हा भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ मुंबईतील सांताक्रूझ भागात असलेल्या एका आलिशान हॉटेलच्या बाहेर होता. यादरम्यान पृथ्वीचा सोशल मीडियावर प्रभाव टाकणारी सपना गिल आणि तिच्या मित्राचा पृथ्वी शॉ बरं वाद झाला. पृथ्वी शॉने सपना गिलसोबत सेल्फी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर या तिघांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ त्या बेसबॉल बॅट हिसकावताना दिसत आहे. त्या मुलीचा साथीदार शॉचा व्हिडिओ बनवत होता.

सपना गिल हिला पोलिसांनी 16 फेब्रुवारी गुरुवारी अटक केली. त्याचवेळी त्याचा मित्र शोभित ठाकूर आणि इतर सहा जणांविरुद्ध दंगल आणि खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तक्रारीनुसार, शोभित ठाकूर आणि सपना गिल हॉटेलमध्ये सेल्फीसाठी शॉ यांच्याकडे आले. सुरुवातीला पृथ्वी शॉने त्याला नकार दिला. पण सपना आणि तिच्या मैत्रिणीने सेल्फी काढण्याचा आग्रह धरला, ही मागणी शॉने नाकारली. त्यानंतर गिल आणि ठाकूर यांनी तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान पृथ्वी शॉच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला.

टॅग्स :Prithvi Shaw