जुळ्या मुलांचा बाबा; रोनाल्डोनं शेअर केला पार्टनरचा सोनोग्राफी रिपोर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo and Partner Georgina Rodriguez
रोनाल्डोनं शेअर केला पार्टनरचा सोनोग्राफी रिपोर्ट, अन्...

रोनाल्डोनं शेअर केला पार्टनरचा सोनोग्राफी रिपोर्ट, अन्...

मँचेस्टर युनायटेड आणि पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोने इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. पार्टनर जॉर्जीना रोड्रिग्ज लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याची माहिती त्याने दिलीये. रोनाल्डोने यासंदर्भात एक खास पोस्टही लिहिली आहे. आम्ही जुळ्या मुलांचे आई-वडील होणार असल्याचा आनंद आहे. आता आम्ही आणखी प्रतिक्षा करु शकत नाही. या कॅप्शनसह रोनाल्डोने पार्टनरसोबतच सोनोग्राफीचा रिपोर्टही शेअर केला आहे. शेअर केलेल्या पोस्टमधील दुसऱ्या फोटोत रोनाल्डो आपल्या चार मुलांसह स्विमिंग पूलमध्ये दिसतोय.

रोनाल्डो आणि जॉर्जीना रोड्रिग्ज यांना लग्नाआधीच 4 मुले आहेत. या स्वीट आणि प्रसिद्ध कपलच्या पहिल्या मुलीचे नाव अलाना असे आहे. तर 11 वर्षांच्या मुलाचे नाव ख्रिस्टियानो ज्यूनिअर आहे. या जोडीला चार वर्षांची ईवा आणि माटेओ ही जुळी मुले आहेत. 36 वर्षीय रोनाल्डो याचे नाव अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींशी जोडले गेले. मात्र जॉर्जीना रोड्रिग्ज आणि त्याच्या नात्यातील प्रेमाचा गोडवा हा सर्वात चर्चेचा विषय राहिला. लग्नाआधी चार मुलांना जन्म दिल्यानंतर या जोडीनं गुपचूप लग्न उरकले असून आता पुन्हा रोनाल्डोची पार्टनर जुळ्या मुलांना जन्म देणार आहे.

हेही वाचा: फेसबुकला आता 'या' नावाने ओळखले जाणार

रोनाल्डो यंदाच्या हंगामात सुरुवातीला इटालियन क्लप युवेंट्समध्ये सामील झाला होता. मात्र हा क्लब सोडून तो पुन्हा मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात सामील झाला. रोनाल्डोच्या नावे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल डागण्याचा विक्रम आहे. या हंगामाच्या सुरुवातीलाच त्याने हा विक्रम आपल्या नावे केला होता.

Web Title: Cristiano Ronaldo And Partner Georgina Rodriguez Expecting Twins

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Cristiano Ronaldo