ख्रिस्तीयानो रोनाल्डो "सर्वोत्तम फुटबॉलपटू' 

पीटीआय
बुधवार, 11 जानेवारी 2017

माझ्याकडे फार काही बोलण्यासारखे नाही. हे पुरस्कारच बोलके आहेत. मला फार आनंद झाला आहे. 2016चे वर्ष माझ्यासाठी कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरले. लोक आंधळे नसतात आणि ते सामने पाहतात हेच या पुरस्कारावरून दिसून येते. 

 -ख्रिस्तीयानो रोनाल्डो 

प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या शर्यतीत मेस्सीला टाकले मागे 

झ्युरीक :  रेयाल माद्रिद आणि पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने जागतिक फुटबॉल महासंघाचा (फिफा) "मोसमातील सर्वोत्तम फुटबॉलपटू' हा पुरस्कार पटकावला. त्याने या शर्यतीत बार्सिलोना तसेच अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी या कट्टर प्रतिस्पर्ध्याला मागे टाकले. 

रोनाल्डोसाठी मागील वर्ष फलदायी ठरले. त्याने क्‍लबसाठी चॅंपियन्स लीग, तर देशासाठी युरो करंडक जिंकला. बार्सिलोनाची बुधवारी ऍथलेटिक बिल्बाओविरुद्ध महत्त्वाची लढत आहे. त्यामुळे मेस्सीसह कोणत्याही आमंत्रित खेळाडूला या सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी नाकारण्यात आली. मेस्सी नसल्याबद्दल रोनाल्डोने नाराजी व्यक्त केली, पण ही परिस्थिती समजण्यासारखी आहे, असेही तो म्हणाला. रोनाल्डोने "फिफा'चे अध्यक्ष जियान्नी इन्फंटिनो यांच्या हस्ते पुरस्काराचा करंडक स्वीकारला. 

रोनाल्डो म्हणाला की, "पोर्तुगालसाठी जिंकलेला युरो करंडक अनोखा आहे. मी अर्थात चॅंपियन्स लीग आणि क्‍लब विश्‍वकरंडक विसरू शकत नाही. आम्ही सर्वोत्तम पद्धतीने वर्षाची सांगता केली. वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर अनेक करंडक जिंकल्याचा मला अभिमान वाटतो.' 
सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार इटलीच्या क्‍लाउडियो रॅनिएरी यांना मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळविले. 

माझ्याकडे फार काही बोलण्यासारखे नाही. हे पुरस्कारच बोलके आहेत. मला फार आनंद झाला आहे. 2016चे वर्ष माझ्यासाठी कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरले. लोक आंधळे नसतात आणि ते सामने पाहतात हेच या पुरस्कारावरून दिसून येते. 
- ख्रिस्तीयानो रोनाल्डो 

पहिला-दुसरा, दुसरा-पहिला 
गेल्या काही वर्षांत रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातच या पुरस्कारासाठी मुख्य चुरस राहिली. 2008, 13 आणि 14 मध्ये रोनाल्डोला किताब मिळाला. दरवेळी मेस्सी दुसरा होता. मेस्सीने 2009 ते 12 आणि 15 मध्ये हा मान मिळविला. यात एक अपवाद वगळता दरवेळी मेस्सी दुसरा आला. 2010 मध्ये आंद्रेस इनीएस्टा दुसरा होता 
-------------- 
रोनाल्डोचा धडाका 
- 44 सामन्यांत गोल, 14 ऍसिस्ट 
- युरोपमधील पाच प्रमुख लीगमध्ये प्रतिमिनीट गोलच्या सरासरीत तिसरा. लुईस सुआरेझ (82.57), रॅडॅमेल फाल्काओ (59.6) दुसरा, तर रोनाल्डो (83.68) तिसरा 
- चॅंपियन्स लीगमध्ये 2015-16च्या मोसमात 16 गोल. दुसऱ्या क्रमांकावरील रॉबर्ट लेवंडोस्की याच्यापेक्षा सात गोल जास्त 
--
मतदानाची टक्केवारी 
रोनाल्डो : 34.54 
मेस्सी : 26.42 
अँटोईन ग्रीझमन : 7.53 
 

Web Title: Cristiano Ronaldo Crowned FIFA Best Men's Player